घरमहाराष्ट्रपुण्यात दोन सराईत गुन्हेगारांना अटक

पुण्यात दोन सराईत गुन्हेगारांना अटक

Subscribe

भोसरी पोलीस ठाण्यातील तडीपार तर भोसरी पोलीस ठाण्यातील खुनाचा प्रयत्न गुन्ह्यातील फरार आरोपी अशा दोन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे

एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यातील तडीपार तर भोसरी पोलीस ठाण्यातील खुनाचा प्रयत्न गुन्ह्यातील फरार आरोपी अशा दोन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई खंडणी दरोडा विरोधी पथकाने भोसरी परिसरात केली. चाँद गफूर शेख (वय २५, महात्मा फुलेनगर, भोसरी) आणि शुभम उर्फ दाद्या माने (वय २०, रा. साईनाथ कॉलनी, भोसरी) अशी अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. दोघांनी या परिसरात उच्छाद मांडला असल्यामुळे त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

तडीपार असूनही शहरात फिरत होता आरोपी

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शेख हा सराईत गुन्हेगार आहे. तो तडीपार असूनही शहरात फिरत असल्याची खबर पोलीस कर्मचारी सागर शेडगे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी एमआयडीसी येथे सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. तडीपार कालावधीत पुणे जिल्ह्यात येण्याबाबत परवानगी आहे का, असे विचारले असता त्याच्याकडे कोणतीही परवानगी नसल्याचे समजले. त्यावरून त्याला अटक करण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -