Eco friendly bappa Competition
घर उत्तर महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रातही अवघ्या आठ महिन्यात शेतकरी आत्महत्यांच द्वीशतक

उत्तर महाराष्ट्रातही अवघ्या आठ महिन्यात शेतकरी आत्महत्यांच द्वीशतक

Subscribe

नाशिक : गेल्या आठ महिन्यांपासून मराठवाड्यात तब्बल 685 शेतकऱ्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलेले आहेत. याचा अर्थ दिवसाकाठी शेतकरी 2 ते 3 आत्महत्या करत आहेत. ही बातमी दोन दिवसपूर्वी समोर आल्यानंतर मोठे आश्चर्य व्यक्त करण्यात आले. मात्र, मराठवाड्या पाठोपाठ उत्तर महाराष्ट्राचीही स्थिती आणि आकडेवारी गंभीर असल्याचे समोर आले आहे. उत्तर महाराष्ट्रात मागील आठ महिन्यात तब्बल 200 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

खालावलेली मानसिकता, कौटुंबिक दारिद्र्य, शेतीवरील कर्ज, सावकारी कर्ज, नापिकी, दुष्काळ, अस्मानी आणि सुलतानी संकटामुळे शेतकरी आत्महत्याची आकडेवारी मागील काही वर्षात वाढतानाच दिसून येते. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यातील एकूण ५४ तालुक्यांतून समोर आलेल्या आकडेवारीत हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. 1 जानेवारी 2023 ते 1 ऑगस्ट 2023 या आठ महिन्यांच्या काळात 200 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे. आत्महत्यांची कारणे जरी वेगवेगळी असली, तरी कर्ज आणि नापिकी ही मुख्य दोन कारणे समोर येत आहेत.

- Advertisement -

1 जानेवारी ते 31 ऑगस्ट 2023 दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात ४८, जळगाव जिल्ह्यात १०४, नाशिक जिल्ह्यात 8, धुळे जिल्ह्यात ३६, तर नंदुरबार जिल्ह्यात 4 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची आकडेवारी सरकार दप्तरी आहे. जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आकडा मोठा असून, त्या खालोखाल अहमदनगर व धुळ्याचा नंबर लागतो. २०० पैकी आत्महत्याग्रस्त 65 शेतकरी कुटुंबांना सरकारी मदत किंवा अनुदानाचा लाभ मिळू शकला आहे. 103 आत्महत्याग्रस्त कुटुंब अद्यापही चौकशी, सरकारी नियमांची पूर्तता, कार्यालयांच्या चकरा यातच अडकून पडले आहेत. उर्वरितांची तर प्रशासनाकडून दखलही घेण्यात आलेली नाहीये. या दखल न घेतल्या गेलेल्या किंवा सरकारी नियमानुसार अपात्र ठरलेल्या 32 आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुतूनबचे पुढे काय असा मोठा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो.

कुठल्या जिल्ह्यात किती आत्महत्या 

  • जळगाव जिल्हा : १०४
  • अहमदनगर जिल्हा : ४८
  • धुळे जिल्हा : ३६
  • नाशिक जिल्हा : 8
  • नंदुरबार जिल्हा : 4
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -