घरताज्या घडामोडीधक्कादायक! बालसुधारगृहात दोन अल्पवयीन मुलांची आत्महत्या

धक्कादायक! बालसुधारगृहात दोन अल्पवयीन मुलांची आत्महत्या

Subscribe

बालसुधारगृहात दोन अल्पवयीन मुलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

सध्या आत्महत्येच्या घटना वाढत आहेत. या आत्महत्येचे सत्र सुरु असतानाच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बुलडाण्याच्या बालसुधारगृहातील दोन अल्पवयीन मुलांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. ही घटना आज सकाळी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली असून या दोन्ही अल्पवयीन मुलांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येचा घटनाक्रम खोलीतील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

नेमके काय घडले?

बुलडाणा जिल्ह्याच्या शेगांव येथे दहा दिवसांपूर्वी दोन अल्पवयीन आरोपींना गुन्ह्याखाली पकडण्यात आले होते. त्यानंतर त्यांची रवानगी बुलडाणा येतील बालसुधारगृहात करण्यात आली. दरम्यान, या दोघांमधील एकाने दोनवेळा बालसुधारगृहातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण, त्या आरोपीचा दोनदाही प्लॅन फसला गेला आणि त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन पुन्हा बालसुधारगृहात आणले होते.

- Advertisement -

असा आला गुन्हा उघडकीस

दरम्यान, ज्या बालसुधारगृहाच्या खोलीत हे दोन आरोपी राहत होते, त्यावेळी त्यांच्यासोबत अजून एक आरोपी होता. हा तिसरा आरोपी ज्यावेळी झोपला होता, त्या दरम्यान या दोन आरोपींनी गळफास घेऊन आत्महत्या केली. या दोघांनी टॉवेल आणि बेडशीटला लटकून आपले जीवन संपवले. ज्यावेळी तिसऱ्या आरोपीला जाग आली त्यावेळी हे दोघेही लटकत असल्याचे दिसून आले. त्यांनी आरडाओरड केला आणि सर्व कर्मचारी जमा झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. हा सर्वप्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. मात्र, या दोघांनी आत्महत्या का केली आहे? याचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणाचा पोलीस अधिक तपास करीत आहेत.


हेही वाचा – यामुळे लग्नाच्या तीन दिवसांपूर्वी तरुणांचा कापला प्रायव्हेट पार्ट!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -