घरताज्या घडामोडीशिल्पाने रेस्टॉरंट ओपनिंगपूर्वी 'या' मराठी जोडप्याला दिलं आमंत्रण

शिल्पाने रेस्टॉरंट ओपनिंगपूर्वी ‘या’ मराठी जोडप्याला दिलं आमंत्रण

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने अलीकडेच एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. शिल्पा शेट्टीने हे फोटो शेअर करत नवे रेस्टॉरंट सुरू केल्याबाबत चाहत्यांना सांगितले. सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो हे शिल्पाच्या नव्या रेस्टॉरंटचे आहे. हे रेस्टॉरंट बॉलिवूडच्या सेलिब्रिटांना हँगआउट करण्यासाठी आहे. बॅस्टिअन चॅन हे रेस्टॉरंट असून शिल्पा शेट्टी या रेस्टॉरंटची ओनर आहे. या रेस्टॉरंटच्या ओपनिंगपूर्वी शिल्पाने एका मरामोठ्या जोडप्याला जेवणासाठी आमंत्रण दिले होते. ते कोणते मराठमोळे जोडपे होते ते पाहा.

शिल्पा शेट्टीचे हे नवे रेस्टॉरंट मुंबईतील वरळी येथे सुरू केले आहे. शिल्पाने सोशल मीडियावर दोन फोटो शेअर केले आहेत. पहिला फोटो शेअर करताना शिल्पाने लिहिले आहे की, ‘आणि हे तयार आहे.’ या फोटोमध्ये शिल्पाने रेस्टॉरंटमध्ये एका वेगळ्याचं अंदाजात पोझ दिली आहे. तर शिल्पाने शेअर केलेला दुसऱ्या फोटोमध्ये शिल्पा शेट्टीसह तिचा पती राज कुंद्रा आणि मराठमोळ जोडप रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा-देशमुख दिसत आहे. तसेच याशिवाय काँग्रेसचे आमदार धीरज देशमुख देखील उपस्थित आहेत. शिल्पा शेट्टीच्या नव्या रेस्टॉरंटमधील हे पहिलेच गेस्ट आहेत. हा सर्वांचा फोटो शेअर करताना शिल्पाने लिहिले की, ‘गेल्या रात्री ९ वाजता माझे पहिले नाईट आऊट. माझ्या मित्रांसोबत मुंबईच्या वरळीतील बॅस्टिअनमध्ये सुंदर स्वाद आणि चांगल्या जेवणाच्या रात्र.’

- Advertisement -

रितेश देशमुखची पती जेनेलियाने वरळीतील बॅस्टिअन रेस्टॉरंटचा फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर शेअर केला आहे. तुम्ही रेस्टॉरंटच्या आतमधली झलक पाहू शकता. जेनेलियाने फोटो शेअर करत, शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राचे आभार मानले आहेत. तिने लिहिले की, ‘शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा या सुंदर रात्रीसाठी धन्यवाद. जेवण खूप छान होत.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

- Advertisement -

हेही वाचा – सारा-अक्षय कुमारच्या ‘अतरंगी रे’च्या शूटिंगला सुरुवात


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -