घरताज्या घडामोडीUddhav Thackeray : मी केवळ मॅच पहात नाही तर खेळून जिंकतोही; उद्धव...

Uddhav Thackeray : मी केवळ मॅच पहात नाही तर खेळून जिंकतोही; उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर निशाणा

Subscribe

मी एका बाजूला बसून तुमची मॅच बघतोय असा नाही. मी मॅच बघणारा नाहीये, तर मी खेळणारा आणि जिंकणारा आहे. कारण मी मॅच बघणारा अमित शाहाचा पोरगा नाही, असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि त्यांचे पूत्र जय शाह यांच्यावर निशाणा साधला. (Uddhav thackeray slams amit shah and jay shah at budhana sabha lok sabha 2024)

उद्धव ठाकरे हे जनसंवादाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत आहेत. आज (20 मार्च) उद्धव ठाकरे बुलढाणा दौऱ्यावर होते. बुलढाण्यातील मेहकर येथे ठाकरेंची सभा झाली. या सभेत ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि त्यांचे पूत्र जय शाह यांच्यावर निशाणा साधला.

- Advertisement -

“सध्या माहिती मिळतेय की शिवसैनिकांवर केसेस टाकल्या जात आहेत. तर समजून येतंय की हे नुसते गद्दार नाहीत तर नामर्द आहेत. तुम्ही मर्दाची अवलात असाल तर मी आणि माझे शिवसैनिक येतो. तुम्ही पोलिसांना बाजूला ठेवून या. मग होऊन जाऊ दे काय ते एकदाचं. त्यावेळी मी एका बाजूला बसून तुमची मॅच बघतोय असा नाही. मी मॅच बघणारा नाहीये, तर मी खेळणारा आणि जिंकणारा आहे. कारण मी मॅच बघणारा अमित शाहाचा पोरगा नाही. मी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा पूत्र आहे”, असा टोला उद्धव ठाकरेंनी शाह पिता-पूत्रांना लगावला.

“अमित शहा बोलले की शिवसेना पूत्र प्रेमामुळे फुटली. आहो मग अमित शाह आपला भारतीय संघ तुमच्या पुत्र प्रेमामुळेच सामना हरला. कारण ज्याला काही पडलेली नाही. ज्याचा क्रिकेटशी काही संबंध नाही. अशा पोरोला केवळ तुमची मस्ती, केवळ तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात म्हणून फोन करून क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा अध्यक्ष केल. पण तुमच्या पोरानी क्रिकेटचा अंतिम सामना जो महाराष्ट्राच्या मुंबईत व्हायला पाहिजे होता, तो गुजरातला घेऊन गेले आणि आपण हरलो अशी लोकं म्हणतात”, अशीही टीका उद्धव ठाकरेंनी केली.

- Advertisement -

“ही शिवसेना ही चार अक्षरं जर यांच्या मागे नसती तर, यांनी लोकसभा किंवा विधानसभा पाहिली असती का, त्यावेळी शिवसेनाप्रमुखांनी तुम्ही कोण आहात याचा विचार न करता तुम्हाला विधिमंडळात आणि लोकसभेत पाठवलं. त्याच शिवसैनिकांना तुम्ही शिव्या देत आहात. त्याच शिवसैनिकांवर तुम्ही खोटे गुन्हे दाखल करत आहात. थोडे दिवस थांबा, सगळे दिवस सारखे नसतात”, असेही ठाकरे यावेळी म्हणाले.


हेही वाचा – Buldhana : कत्तलखान्याच्या मालकांकडून निवडणूक रोखे घेऊन आम्हाला हिंदुत्व…; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -