घरपालघरशिवसेना उमेदवाराचा प्रचार करण्यास भाजपचा नकार

शिवसेना उमेदवाराचा प्रचार करण्यास भाजपचा नकार

Subscribe

शिंदे यांनी आग्रह धरल्यामुळे महायुतीतील वाटाघाटीनंतर शिंदे गटालाच जागा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

भाईंदर :- ठाणे लोकसभा मतदार संघात भाजपचे वर्चस्व आहे. त्यामुळे ही जागा भाजपला मिळावी, शिवसेना शिंदे गटाला ही जागा मिळाल्यास ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेना उमेदवाराचा प्रचार करण्यास भाजपच्या मीरा-भाईंदर मधील कार्यकर्त्यांनी नकार दिला आहे. ठाणे लोकसभेची जागा शिवसेना शिंदे गटाला न सोडता, ती जागा भाजपलाच मिळावी अशी आग्रहाची मागणी मीरा- भाईंदर भाजपकडून करण्यात आली आहे. या संदर्भात पक्ष कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना पत्र पाठवून तसेच प्रत्यक्ष भेटून याबाबतची नाराजी जाहीर केली आहे. ठाणे लोकसभा मतदार संघाचे नेतृत्व २०१४ पासून ठाकरे गटातील शिवसेनेचे नेते राजन विचारे हे करत आहेत. पूर्वी भाजप व शिवसेनेची युती असल्यामुळे ही जागा शिवसेनेकडे आहे. त्यावेळी शिवसेनेचे राजन विचारे हे निवडून आलेले आहेत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत वेगळा गट स्थापन करत भाजपशी युती केली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत ही जागा शिवसेनेच्या म्हणजे शिंदे गटाला मिळावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्नशील आहेत. शिंदे यांनी आग्रह धरल्यामुळे महायुतीतील वाटाघाटीनंतर शिंदे गटालाच जागा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

त्यामुळे या मतदारसंघात भाजपचे वर्चस्व असताना ही जागा शिंदे गटाला देण्यास भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून विरोध केला जात आहे. यामध्ये मीरा -भाईंदरचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी मीरा -भाईंदरमध्ये शिवसेनेसाठी प्रचार करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे या जागेचा तिढा निर्माण झाला असून जागा वाटप रखडले आहे. आघाडी सरकारच्या काळात राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेकडून मीरा- भाईंदरमध्ये भाजपला दाबण्याचे अप्रत्यक्ष प्रयत्न केले जात असल्याचे पदाधिकार्‍यांकडून सांगितले जात आहे. महायुती सरकारच्या काळात शिवसेना-भाजप दोन्हीही पक्ष सत्तेत असताना देखील अनेक वेळा वाद झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ही जागा भाजपला मिळावी, भाजप कडून लढणार्‍या उमेदवारासाठी मीरा -भाईंदर भाजपकडून काम केले जाईल तसे पत्राद्वारे पक्षाच्या वरिष्ठांनाही पदाधिकार्‍यांकडून कळवण्यात आले आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया,

मीरा -भाईंदर शहरात व या मतदारसंघात इतर ही ठिकाणी भाजपचे वर्चस्व आहे. पक्षाचे संघटन आणि काम पाहता ही जागा भाजपलाच मिळावी अशी सर्वच कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यामुळे पक्षाच्या उमदेवारासाठी आम्ही काम करू इतर कोणत्याही पक्षाच्या उमेदवारासाठी आम्ही काम करणार नसल्याचे मत वरिष्ठांना कळविले आहे.

- Advertisement -

– नरेंद्र मेहता, माजी आमदार, भाजप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -