घरमहाराष्ट्रशिवसैनिकांचे स्वप्न पूर्ण होणार; शिवतीर्थावर उद्धव ठाकरे घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ

शिवसैनिकांचे स्वप्न पूर्ण होणार; शिवतीर्थावर उद्धव ठाकरे घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ

Subscribe

राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एक मोठा भूकंप आला. या राजकीय भूकंपानंतर भाजप सरकार अस्थिर झाले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. या सर्व घडामोडींनंतर आता राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे पुढील पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री होणार असल्याचे जाहीर केले आहे. महाविकास आघाडीने दिलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे उद्या शिवतीर्थावर मुख्यमंत्रिपदाची तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

शिवसैनिकांचे स्वप्न पूर्ण होणार

शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा हे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले होते. बाळासाहेबांच्या या स्वप्नासाठी मी काहीही करेल, असेही ते म्हणाले होते. आज देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर हे स्वप्न पूर्ण होणार आहे. याअगोदर शिवसेनेचे नेते मनोहर जोशी १९९५ ते १९९९ या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते. त्यानंतर दुसऱ्यांदा शिवसेनेला मुख्यमंत्रिपादची जबाबदारी मिळणार आहे.

- Advertisement -

शिवतीर्थाशी शिवसेनेचे अतूट नातं

शिवतीर्थाशी शिवसेनेचे एक वेगळे असे नाते आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा दरवर्षी शिवतीर्थावरच भरतो. दसरा मेळाव्यात शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत पुढच्या दसरा मेळाव्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री व्यासपीठावर उपस्थित राहणार, असे म्हणाले होते. त्यांचे हे वक्तव्य आता सत्यात अवतरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -