घरठाणेदिव्यात अनेक इमारतींवर अनधिकृत मोबाईल टॉवर

दिव्यात अनेक इमारतींवर अनधिकृत मोबाईल टॉवर

Subscribe

ठाणे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

ठाणे जिल्ह्यातील अनेक शहरात कळवा, मुंब्रा, दिवा अनधिकृत इमारतींवर मोबाईल टॉवर असून एक प्रकारे ठाणे महापालिका नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे, असे दिसून येत आहे. दिव्यातील अनेक अनधिकृत इमारतीवर मोबाईल टॉवर असून त्यातून बाहेर पडणार्‍या रेडिएशनमुळे त्रास होऊन अनेकांना मोठमोठ्या आजारांना समोरे जावे लागत आहे. यात मोठ्या मोबाईल कंपन्यांनी दिव्यात घुसखोरी केली असून अवैधपणे बांधकाम व्यवसायिकांना पैशांचे आमिश दाखवून अनेक अनधिकृत इमारतींवर अवैध मोबाईल टॉवर उभारले जात आहे. प्रत्येक दहा इमारती मागे 3 ते 4 इमारतींवर मोबाईल टॉवर बसवले जात असून यावर अद्याप कोणतीच कारवाई होत नाही. सुमारे 200 फूट उंचीच्या मोबाइल टॉवरमधून निघणार्‍या रेडिओ लहरी (विद्युत चुंबकीय) या जमिनीशी समांतर जात असल्या तरी त्या काँक्रीट भिंतीनाही भेदून आरपार जाणार्‍या असल्यामुळे कालांतराने अनेक रोग आणि व्याधींना जन्म देतात.

मोबाइल टॉवर लावताना केलेल्या ड्रिलिंगमुळे इमारत खिळखिळी होते ते वेगळेच. अशा कमकुवत झालेल्या वा जुन्या इमारतींवर बसविलेले हे टॉवर्स अतिवृष्टी, वादळे व भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीत अधिक विनाशाला कारणीभूत होतात. चुकीची वीज जोडणी झाल्यास शॉटसर्किटमुळे आग लागण्याचा धोकाही संभवतो. टॉवरला आणि त्या वातानुकूलनासाठी भारनियमन असलेल्या भागात लावलेल्या विद्युत जनित्रामुळे शहरात आधीच असलेल्या प्रदूषणामध्ये भर पडते, ती निराळीच महत्वाची गोष्ट म्हणजे दिव्यातील जवळ जवळ बहुतेक इमारती या अनधिकृत असून कामाचा दर्जा देखील कमकुवत आहे. त्यामुळे मोबाईल कंपन्यांचे भरमसाठ लोड असलेले हे टावर इमारतीवर उभारत आहेत. भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे अनेक सुशिक्षित नागरिकांनी आपली नाराजी व्यक्त करत दिव्यातील अवैध मोबाईल टॉवर्सविषयी कठोर कारवाई करून हे टॉवर हटवण्यात यावेत, तसेच नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ठाणे महापालिकेने या विषयी पावले उचलावीत असे मत तरुण तरुणी, पर्यावरण प्रेमी, समाजसेवक, ज्येष्ठ नागरिकांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -