Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली पोलिसांनी मला ताब्यात घेतले; संजय निरुपमांचा आरोप

मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली पोलिसांनी मला ताब्यात घेतले; संजय निरुपमांचा आरोप

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दबावाखाली मला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा आरोप संजय निरूपम यांनी केला. तसेच, माझ्या घराखाली जेवढे पोलीस होते, तेवढे पोलीस मुख्यमंत्र्यांच्या सांगण्याने सक्रीय झाले होते, असेही त्यांनी म्हटले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम यांना वर्सोवा पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दबावाखाली मला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा आरोप संजय निरूपम यांनी केला. तसेच, माझ्या घराखाली जेवढे पोलीस होते, तेवढे पोलीस मुख्यमंत्र्यांच्या सांगण्याने सक्रीय झाले होते, असेही त्यांनी म्हटले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम यांना वर्सोवा पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आज कॉंग्रेसकडून बाईक रॅली काढण्यात येणार होती. पण त्या बाईक रॅलीच्या आधीच निरुपम यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. (Under pressure from the Chief Minister the police detained me Sanjay Nirupam allegation)

कॉंग्रेस नेते संजय निरूपम यांनी पोलीस ठाण्यातून बाहेर आल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी संजय निरुपम यांनी मुंबई पोलीस दबावाखाली काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. पुढे निरुपम म्हणाले की, “आज आमची बाईक रॅली होती. खासदार गजानन कीर्तिकर आमच्या विभागाचे खासदार आहेत. मागील साडेतीन वर्षांपासून गजानन कीर्तिकर कुठेही फिरलेले नाहीत. मतदारसंघात फिरलेले नाहीत. कोणाला भेटलेले नाहीत. त्यानंतर गजानन कीर्तिकर हे पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात म्हणजेच शिंदे गटात गेले. गजानन कीर्तिकरांचा शिंदे गटात जाण्याचा हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आम्हाला त्यामध्ये पडायचे नाही. परंतु, कीर्तिकर हे पैसे घेऊन किंवा ईडीच्या भितीने किंवा कोणती अडचण आहे, म्हणून ते शिदे गटात गेले अशतील तर, तो त्यांचा विषय आहे. पण जो खासदार अडीच ते तीन वर्षांपासून निष्क्रीय आहे, अशा खासदाराला पदावर राहण्याचा काहीही अधिकार नाही. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. त्यामुळे गजानन कीर्तिकरांकडून राजीनामा मागण्यासाठी आमची आज बाईक रॅली होती”.

- Advertisement -

“मला एक कळत नाही की, मुंबई पोलीस एवढे का घाबरत आहेत. मंगळवारी रात्रीपासून पोलिसांनी माझ्या घराखाली पहारा ठेवलाय. सकाळीही बरेच पोलीस घराखाली होते. आज जिथून आमची बाईक रॅली सुरू होणार होती. तिकडेही पोलिसांच्या 10 ते 15 गाड्या होत्या. सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी तिकडे होते आणि त्यांना आमची रॅली अडवायची होती. पण आम्ही त्यांना रितसर परवानगबाबत कागदपत्र दिली होती. तसेच, बाईक रॅलीसाठी परवानगी दिली नाही, तर आम्ही बाईक रॅली सुरू करणार आणि तुम्हाला काय कारवाई करायची असेल ती त्यांनी करावी”, असेही संजय निरुपम यांनी म्हटले.

“आज सकाळी 11 वाजता काही पोलीस माझ्या घरी आले आणि त्यांनी मला वर्सोवा पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले. त्यावेळी माझे अटक वॉरंट तुमच्याकडे आहे का, असा सवाल विचारला. तर त्यांनी मला पोलीस ठाण्यात चला तिकडे आहे असे सांगितले. तसेच, पोलिसांनी घरी आल्यावर मला कोणतेही लेटर न दाखवता ताब्यात घेतले आणि वर्सोवा पोलीस ठाण्यात नेले. चार ते पाच तास मला पोलीस ठाण्यात ठेवले पण एकही कागदपत्र मला दाखवला नाही”, असेही त्यांनी सांगितले. शिवाय पोलिसांनी बेकायदेशीर अटक केल्याचा आरोपही त्यांनी केला.

- Advertisement -

“आज आमचा राजकीय कार्यक्रम होता आणि सरकारला आमच्याविरोधात कारवाई करायची असेल, तर त्यांनी राजकीय लढा द्या. आमच्या बाईल रॅलीला घाबरत असाल तर तुम्हीही बाईक रॅली काढा. पण पोलिसांना पुढे करून मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना त्रास देणे चुकीचे आहे. तसेच, ज्या एसीपीने मला अनधिकृतरित्या ताब्यात घेतले. त्यांच्यावर निलंबनाची करावाई करण्यात यावी अशी मागणी संजय निरूपम यांनी केली. त्याशिवाय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दबावाखाली मला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा आरोपही यावेळी संजय निरूपम यांनी केला. तसेच, माझ्या घराखाली जेवढे पोलीस होते, तेवढे पोलीस मुख्यमंत्र्यांच्या सांगण्याशिवाय सक्रीय होतील का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.


हेही वाचा – इंदू मिलमध्ये इंटरनॅशनल रिसर्च सेंटर सुरू करण्याबाबत प्रकाश आंबेडकरांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -