इंदू मिलमध्ये इंटरनॅशनल रिसर्च सेंटर सुरू करण्याबाबत प्रकाश आंबेडकरांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृह येथे एकनाथ शिंदे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. या भेटीमध्ये मुख्यमंत्र्यांनी हिंदू मिलच्या जागेबाबत चर्चा केल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

Prakash Ambedkar

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या दादरमधील राजगृह येथे एकनाथ शिंदे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. या भेटीमध्ये मुख्यमंत्र्यांनी इंदू मिलच्या जागेबाबत चर्चा केल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली. तसेच, ही भेट राजकीय नसून सदिच्छा भेट असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हटले.

वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांनी इंदू मिलबाबत माहिती घेण्यासाठी चर्चा केल्याचे सांगितले. तसेच, “मुंबईमध्ये १४ एकर जागा आहे. इंदू मिलमध्ये इंटरनॅशनल रिसर्च सेंटर सुरू करण्याची मागणी केली. त्यासंदर्भात त्यांना माहितीही दिली”, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

याशिवाय, वंचित बहूजन आघाडी आणि ठाकरे गटाच्या एकत्रित येण्याबाबतही प्रकाश आंबेडकर यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “मविआच्या काही नेत्यांनी माझ्याशी संपर्क साधला होता. त्यावेळी मी त्यांनी सांगितले की, मविआ यापुढे एकत्र राहणार असेल तर, त्यामध्ये वंचित बहूजन आघाडीचा समावेश कसा होईल, याचा आरखडा तयार केलेला आहे का, तसेच नाना पटोले यांनी कॉग्रेस एकटी लढणार असल्याचे म्हटले. त्यामुळे मविआ म्हणून तुम्ही एकत्र राहणार आहात का, एकटे लढणार असे विचारले. त्यावर अजूनही मविआच्या नेत्यांकडून उत्तर आलेले नाही. जर सर्व एकटे लढणार असतील तर आम्हीही वेगळे लढायला तयार आहोत”, असेही आंबेडकर यांनी सांगितले.

दरम्यान, पत्रकार, समाजसुधारक आणि फर्डे वक्ते केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त येत्या २० नोव्हेंबरला मुंबईतील शिवाजी मंदिरमध्ये ‘प्रबोधन डॉट कॉम’ या संकेतस्थळाचं लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकाच मंचावर येणार आहेत. दोन्ही मान्यवरांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.


हेही वाचा – नवाब मलिकांचा पाय आणखी खोलात; अ‍ॅट्रोसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश