घरमहाराष्ट्रOmicron Variant : RTPCR चाचण्या वाढवा; 'ओमिक्रॉन'बाबत केंद्रीय आरोग्य सचिवांचं राज्याच्या मुख्य...

Omicron Variant : RTPCR चाचण्या वाढवा; ‘ओमिक्रॉन’बाबत केंद्रीय आरोग्य सचिवांचं राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र

Subscribe

कोरोना नियमावलीचं पालन करण्याच्या दिल्या सूचना

ओमिक्रॉन व्हेरियंटबाबत Omicron variant) केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पत्र लिहिलं आहे. कोरोना नियमावलीचं पालन करण्याच्या सूचना या पत्रातून करण्यात आल्या आहेत. तसंच, RTPCR चाचण्या वाढवा आणि सर्व आंतरराष्ट्रीय विमानांवर नजर ठेवण्याच्याही सूचना करण्यात आल्या आहेत.

दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉन हा कोरोनाचा नवीन व्हेरियंट सापडल्यानंतर जगभरात खळबळ उडाली आहे. आफ्रिकेनंतर इतर देशांमध्ये त्या व्हेरियंटचे रुग्ण आढळून आले आहेत. यासंदर्भात केंद्र सरकारने सर्व राज्यांना खबरदारीच्या सूचनमा दिल्या आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी ओमिक्रॉन या नवीन व्हेरियंटबाबत सर्व राज्यांना पत्र लिहित देखरेख वाढवा तसंच कोरोना लसीकरणाला गती देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या नवीन व्हेरियंटबाबत उच्च अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी आंतरराष्ट्रीय उड्डाणांच्या शिथिलतेचा आढावा घेण्यासह कोरोना लसीकरण आणि कोविड परिस्थितीवर चर्चा केली. याशिवाय, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नव्या व्हेरियंट संदर्भात आज संध्याकाळी बैठक बोलावली आहे. शनिवारी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दक्षिण आफ्रिकेतील देशांतून आलेल्या व्यक्तींना कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांचे जीनोम सिक्वेन्सिंग केले जाईल, अशी घोषणा केली.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -