घरताज्या घडामोडीअकोला जि.प. : 'वंचित'चा काँग्रेस-राष्ट्रवादीला फटका

अकोला जि.प. : ‘वंचित’चा काँग्रेस-राष्ट्रवादीला फटका

Subscribe

अकोला जिल्हा परिषदमध्ये ५३ जागांसाठी निवडणूक लढवली गेली होती. त्यातील २६ जागांवर वंचित बहुजन आघाडीने बाजी मारली आहे.

अकोला जिल्हा परिषदेच्या ५३ जागांसाठी मंगळवारी मतदान झाले तर बुधवारी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली. या मतमोजणीच्या अंतिम टप्प्यात अकोला जिल्हा परिषदेवर वंचित बहुजन आघाडीची सत्ता आली आहे. अकोला जिल्हा परिषद मध्ये ५३ जागांसाठी निवडणूक लढवली गेली होती. त्यातील २६ जागांवर वंचित बहुजन आघाडीने बाजी मारली आहे.

राज्यात आज, बुधवारी जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची मतममोजणी पार पडली. या मतमोजणीमध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर असलेल्या या निवडणुकीत काय होणार याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. नागपूर, धुळे, नंदुरबार, पालघर, अकोला आणि वाशिम जिल्हा परिषदांचे आज निकाल लागला आहे.

- Advertisement -

पालघरमध्ये ‘महाविकास’ आघाडीची सत्ता

पालघर जिल्हा परिषदेच्या ५७ जागांसाठी २२९ उमेदवार होते. तर आठ तालुक्यांतील पंचायत समितीच्या ११४ जागांसाठी ४३४ उमेदवार नशिब आजमावत होते. तर पालघर जिल्ह्यात शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढत होते. तर काँग्रेस, राष्ट्रवादी, माकप आणि बहुजन विकास आघाडी हे ‘महाआघाडी’ करुन लढा देत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -