घरदेश-विदेशवंदे भारत एक्सप्रेसने ट्रायल रनमध्ये मोडले सर्व रेकॉर्ड; स्पीड पाहून व्हाल अवाक

वंदे भारत एक्सप्रेसने ट्रायल रनमध्ये मोडले सर्व रेकॉर्ड; स्पीड पाहून व्हाल अवाक

Subscribe

भारतीय रेल्वे प्रशानसाला एक मोठं यश मिळालं आहे. सेमी हाय स्पीड ट्रेन वंदे भारत एक्स्प्रेसने ट्रायल रनमधील सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. ही ट्रेन ट्रायल रनमध्ये 180 किमी प्रतितास वेगाने धावले आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर ट्रायल रनचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो पाहून सर्वांनाच अवाक व्हायला झाले.

- Advertisement -

वंदे भारत बॅलेंसच्या बाबतीत कमाल

कोटा-नागदा मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे रेल्वेमंत्र्यांनी ट्विट केले. ही ट्रेन 180 किमी/तास वेगाने धावते. वंदे भारत ट्रेनमध्ये एक कमालीचा बॅलेंस पाहायला मिळतो. व्हिडिओमध्ये पाण्याने भरलेला ग्लास दिसत आहे. ही ट्रेन 180 किमी वेगाने धावत असतानाही ग्लास जागेवरून अजिबात हलला नाही. वंदे भारतची ट्रायल रन रिसर्च, डिझाईन आणि स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन (RDSO) च्या टीमच्या देखरेखीखाली झाली. ही ट्रेन 16 डब्यांसह 180 किमी प्रतितास वेगाने धावली.

अनेक टप्प्यांत चाचणी

कोटा विभागात वंदे भारतच्या अनेक ट्रायल घेण्यात आल्या आहेत. त्याची पहिली ट्रायल कोटा आणि घाटाची बारना, दुसरी ट्रायल घाटाची बारणा आणि कोटा, तिसरी ट्रायल कुर्लासी आणि रामगंज मंडी दरम्यान, चौथी आणि पाचवी ट्रायल कुर्लासी आणि रामगंज मंडी दरम्यान, सहावी ट्रायल कुर्लासी आणि रामगंज मंडीदरम्यान पूर्ण झाली आहे.

- Advertisement -

वंदे भारतमध्ये मिळणार ‘या’ सुविधा

स्वदेशी बनावटीची ही ‘वंदे भारत’ सेमी हायस्पीड ट्रेन आहे. वंदे भारत ट्रेनला वेगळे इंजिन नाही. यात ऑटोमेटिक दरवाजे आणि एअर कंडिशनर चेअर कार कोच आणि रिव्हॉल्व्हिंग चेअर आहे. ही चेअर 180 डिग्रीपर्यंत फिरू शकते. ट्रेनमध्ये जीपीएस आधारित माहिती प्रणाली, सीसीटीव्ही कॅमेरे, व्हॅक्यूम आधारित बायो टॉयलेट देखील आहेत.


पंढपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या ट्रकला भीषण अपघात; 30 वारकरी जखमी, 9 गंभीर


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -