घरक्रीडाआशिया चषक स्पर्धेला दुबईत आजपासून सुरुवात, श्रीलंका-अफगाणिस्तान भिडणार आमनेसामने

आशिया चषक स्पर्धेला दुबईत आजपासून सुरुवात, श्रीलंका-अफगाणिस्तान भिडणार आमनेसामने

Subscribe

आशिया चषक स्पर्धेला दुबईत आजपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात होणार आहे. तर दुसरा सामना उद्या संध्याकाळी भारत आणि पाकिस्तानमध्ये रंगणार आहे. त्यामुळे दुबईत होणाऱ्या टी-२० मालिकेचा थरार सर्व क्रिकेट प्रेमींना पाहता येणार आहे.

टी-२० क्रिकेटच्या फॉरमॅटमध्ये भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश तब्बल सहा वर्षानंतर आमने-सामने येणार आहेत. यासाठी दोन्ही संघांकडून कसून सराव सुरू आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि अनुभव मोहम्मद रिझवानकडून पाकिस्तानला बऱ्याच अपेक्षा आहेत. टी-२० मालिकेत मोहम्मद रिझवानने याच मैदानावर जबरदस्त कामगिरी केली होती. त्यामुळे त्याच्या चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

- Advertisement -

२०१६ च्या टी-२० मालिकेत श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात आतापर्यंत एकमेव टी-२० सामना खेळवण्यात आला होता. ज्या मालिकेत श्रीलंकेने विजय मिळवला होता. परंतु मागील काही वर्षांत अफगाणिस्तान संघाने दमदार खेळीच्या जोरावर क्रिडाविश्वावर छाप सोडली आहे. त्यांच्यामध्ये क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये मोठा बदल घडवून आणण्याची क्षमता आहे.

श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील पहिला सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होणार आहे. उद्या होणाऱ्या पाकिस्तानविरूद्ध हायव्होलटेज सामन्यात बीसीसीयकडून प्लेइंग इलेव्हनचे फोटोज शेयर करण्यात आले आहेत. यावेळी बीसीसीआयने १० खेळाडूंचे फोटो ट्वीट केले आहेत.

- Advertisement -

अशी असू शकते प्लेइंग इलेव्हन टीम –

केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, आवेश खान, अर्शदीप सिंग.


हेही वाचा : ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राने रचला नवा इतिहास; डायमंड लीग स्पर्धेत पटकावले विजेतेपद


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -