घरदेश-विदेशपंढपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या ट्रकला भीषण अपघात; 30 वारकरी जखमी, 9 गंभीर

पंढपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या ट्रकला भीषण अपघात; 30 वारकरी जखमी, 9 गंभीर

Subscribe

पंढरपूरला देवदर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांचा ट्रकला भीषण अपघाताची घटना घडली आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील विठ्ठलवाडीमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेत बेळगाव जिल्ह्यातील तब्बल 30 वारकरी जखमी झाले आहेत. यातील 9 भाविकांची प्रकृती गंभीर आहे. या सर्व जखमी भाविकांवर कवठेमहांकाळच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील शिरहट्टी येथील 50 वारकरी पंढरपूरला देवदर्शनासाठी निघाले होते, एका ट्रकमधून जाणाऱ्या वाकरऱ्यांच्या गाडीचा विठ्ठलवाडी येथील रत्नागिरी-नागपूर महामार्गावर शुक्रवारी अपघात झाला. भरधाव वेगात धावणाऱ्या ट्रक चालकाला महामार्गावरील खड्ड्यांचा अंदाज आला नाही, त्यामुळे भरधाव ट्रक समोर असलेल्या एसटीला जाऊन धडकला.

- Advertisement -

यानंतर चालकाने जोरात ब्रेक दाबल्याने ट्रक रस्त्यावरील खड्ड्यातून पलटी झाला. यात सुमारे 30 वारकरी जखमी झाले. दरम्यान घटनेनंतर कवठेमहांकाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, यावेळी या ठिकाणच्या ग्रामस्थांनी देखील तातडीने मदत कार्य करत रुग्णवाहिकेतून जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. दरम्याम जखमींपैकी 9 जणांची प्रकृती अधिक गंभीर आहे.


सेना- संभाजी ब्रिगेड युती म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी, फडणवीसांचा हल्लाबोल

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -