घरमहाराष्ट्रVijay Wadettiwar : सरकारला प्रायश्चित्त करायला लावले जात असेल तर...; वडेट्टीवारांचे सूचक विधान

Vijay Wadettiwar : सरकारला प्रायश्चित्त करायला लावले जात असेल तर…; वडेट्टीवारांचे सूचक विधान

Subscribe

मराठा समाजाला आरक्षणबाबत कोणाचा विरोध नाही. पण मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यावे. ओबीसींच्या कोट्यातून आणि 50 टक्क्यांच्या आत आरक्षण देऊ नये. आमची ही भूमिका काल, आज आणि उद्याही असणार आहे, अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षणावर दिली आहे.

लोणावळा : मराठा समाजाला वेगळे आरक्षण मिळत असेल तर चांगलेच आहे. पण सगेसोयऱ्यांचा कायदा होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवणार आहे, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. सरकारला प्रायश्चित्त करायला लावले जात असेल तर आम्हाला त्याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्ष विजय वडेट्टीवार यांनी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 20 फेब्रुवारीपर्यंत अल्टिमेटवर दिली आहे. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलविले आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी दिली आहे.

सगेसोयऱ्यांचा कायदा होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवणार आहे, असे अल्टिमेटम मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे? या प्रश्नावर विजय वडेट्टीवार म्हणाले, “ते सरकार आणि मनोज जरांगे बघत बसू देत. जर सरकारने खोटे आश्वासन देऊन फसविले असतील तर, सरकार आणि जरांगे यांच्या काय बोलणे झाले, त्यावेळी आम्ही काय साक्षीदार नव्हतो. पण मनोज जरांगे आणि सरकारमध्ये लोणावळ्याच्या बैठकीत बंद दाराआड चर्चा असेल ती ऐकालेली नाही. जे लोक फसवणूक करण्याचे काम करत आहेत. त्यांना प्रायश्चित्त करायला लावले जात असेल तर आम्हाला त्याचा आनंद आहे.”

- Advertisement -

हेही वाचा – Jitendra Awhad : त्यांनी आता तरी मला अक्कल शिकवू नये; शरद पवारांच्या समर्थनानंतर आव्हाड आक्रमक

मराठ्यांना वेगळे आरक्षण मिळत असेल तर आनंद

राज्य सरकार मराठ्यांना 10 टक्के आरक्षण देणार आहे? यावर विजय वडेट्टीवार म्हणाले, “मराठा समाजाला आरक्षणबाबत कोणाचा विरोध नाही. पण मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यावे. ओबीसींच्या कोट्यातून आणि 50 टक्क्यांच्या आत आरक्षण देऊ नये. आमची ही भूमिका काल, आज आणि उद्याही असणार आहे. मराठा समाजाला वेगळे आरक्षण मिळत असेल तर, आम्हाला आनंदच आहे.”

- Advertisement -

हेही वाचा – Rohit Pawar : निवडणुकांसाठी या प्रश्नांचा गुंता…; आरक्षणाच्या प्रश्नावरुन रोहित पवारांचा हल्लाबोल

सत्ताधाऱ्यांनी तिरोजी लुट्याव्यतिरिक्त काय केले?

सरकारच्या कार्यकर्माचे स्थळ मराठा आंदोलकांच्या भीतीमुळे सरकारने बद्दलले आहे या प्रश्नावर विजय वडेट्टीवार म्हणाले, “सरकारचा धाक राहिला नाही. सरकारला कायद्या सुव्यवस्था सांभाळता येत नाही. सरकारमध्ये ऐपत राहिलेली नाही. सत्तधारी म्हणून तुम्हाला काय करता येते तर फक्त तिरोजी लुटता येते. या व्यतिरिक्त काही करता येते का? खरा प्रश्न निर्माण होत आहे. सरकारला कोणी आव्हान देणार असेल आणि शासन खाली मान खालून सरकार झुकत असेल, यात आंदोलनकर्त्यांचे पाय धरणे ऐवढे शिल्लक राहिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -