घरमहाराष्ट्रफडणवीस रामाचा अवतार असल्याचे जाहीर करा - विखे पाटील

फडणवीस रामाचा अवतार असल्याचे जाहीर करा – विखे पाटील

Subscribe

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. काँग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेत जालना येथील जाहीर सभेत ते बोलत होते.

मागील ४ वर्ष महाराष्ट्रात ‘कुराज्य’असताना राज्य सरकारच्या चौथ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ‘सुराज्य यात्रा’ काढताना भाजपला लाज कशी वाटत नाही? नशीब यात्रेला ‘सुराज्य यात्रा’ असे नाव दिले. ‘राम राज्य यात्रा’म्हटले नाही. मोदी विष्णूचा अकरावा अवतार असल्याचे भाजपने जाहीर केलेलेच आहे. आता फडणवीस रामाचा अवतार असल्याचे जाहीर करून टाका. म्हणजे महाराष्ट्रात आपसूकच ‘राम राज्य’ अवतरेल, अशी बोचरी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

जनसंघर्ष यात्रेत एका जिल्ह्याला एक दिवससुद्धा कमी पडतो

काँग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेत जालना येथील जाहीर सभेत ते बोलत होते. राज्य सरकारला चार वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपने २९ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरपर्यंत सुरू केलेल्या सुराज्य यात्रा काढली असून, हाच धागा धरून विखे पाटील यांनी सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले. ते म्हणाले की, भाजपची सुराज्य यात्रा ४ दिवसात एकूण १३ जिल्ह्यात फिरणार आहे. म्हणजे एका दिवसात कमीत कमी तीन जिल्हे फिरणार. काँग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेत एका जिल्ह्याला एक दिवससुद्धा कमी पडतो आणि भाजप एका दिवसात तीन-तीन जिल्हे फिरायला निघाली आहे. आम्ही अनेक यात्रा पाहिल्या. पण अशी बुलेट ट्रेनसारखी वेगवान यात्रा अजून कधी पाहिली नव्हती. कदाचित ही यात्रा इतकी वेगात जाईल, की ती लोकांना दिसणारही नाही. अद्श्यच असल्यासारखी असेल. सरकारचे कामही अदृश्य अन् त्यांची यात्राही अदृश्य असेल. पुढील निवडणुकीत या सरकारलाच अदृश्य केले पाहिजे. अन्यथा पुढील काळात या देशातील शेतकरी अदृश्य झाल्याशिवाय राहणार नाही, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेत्यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -