घरमहाराष्ट्रव्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाचे नाव आता 'कौशल्य विकास परीक्षा मंडळ'

व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाचे नाव आता ‘कौशल्य विकास परीक्षा मंडळ’

Subscribe

कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाचे नाव आता ‘महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास परीक्षा मंडळ’ असे करण्यात आले असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी आज दिली. राज्यातील कौशल्य विकासाला गती देणे आणि त्यामाध्यमातून बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळवून देण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. कौशल्य विकास विभागामार्फत अधिकाधिक तरुणांना विविध अभ्यासक्रमांमधून प्रशिक्षित करुन त्यांना रोजगाराच्या संधी मिळवून देण्यात येतील असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

सध्या या परीक्षा मंडळांतर्गत विविध गटातील शैक्षणिक अर्हतेनुसार ६ महिने कालावधीचे १५२ अभ्यासक्रम, १ वर्ष कालावधीचे ९६ आणि २ वर्ष कालावधीचे ४४ अर्धवेळ व पूर्णवेळ असे एकूण २९२ अभ्यासक्रम राबविण्यात येतात. हे अभ्यासक्रम राज्यामध्ये जिल्हा, तालुकास्तरावर, ग्रामीण भागात मंडळाने मान्यता दिलेल्या १ हजार ८४ संस्थांमध्ये राबविण्यात येत आहेत. या अभ्यासक्रमांसाठी साधारणपणे प्रतिवर्षी ५० ते ६० हजार विद्यार्थी प्रवेश घेत असून, प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा या मंडळामार्फत घेण्यात येते. उत्तीर्ण उमेदवारांना शासनाच्यावतीने मंडळामार्फत प्रमाणपत्र देण्यात येते. राज्यातील विविध भागातील खेड्यापाड्यातील गोरगरीब विद्यार्थी मंडळाच्या मान्यताप्राप्त संस्थांमध्ये प्रवेश घेऊन प्रशिक्षण पूर्ण करतात. मंडळाचे अभ्यासक्रम हे रोजगार व स्वयंरोजगारास चालना देण्याच्या दृष्टीने विशेष करुन शाळा अर्धवट सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरत असल्याचे नवाब मलिक यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

राज्यामध्ये या परीक्षा मंडळाच्या दोन वर्ष कालावधीच्या पूर्ण वेळ स्वरूपाच्या विविध गटातील अभ्यासक्रमांना +२ स्तराची समकक्षता प्रदान करण्यात आली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतात. तसेच मंडळाचे १ वर्ष व २ वर्ष कालावधीच्या पूर्णवेळ अभ्यासक्रमांना औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील अभ्यासक्रमाशी पर्यायी शैक्षणिक अर्हता म्हणून मान्यता असल्याने विद्यार्थ्यांना नोकरीसाठी उपयोग होतो. त्याचप्रमाणे मंडळाच्या काही अभ्यासक्रमांना भारत सरकारतर्फे शिकाऊ उमेदवारी देखील प्रदान करण्यात आली आहे असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

प्रवेशासाठी इयत्ता दहावी ही शैक्षणिक अर्हता असलेल्या २ वर्ष कालावधीच्या अभ्यासक्रमांना ‘पदविका अभ्यासक्रम’ (Diploma Course) अशा नावाने प्रमाणपत्र देण्यात येते. तसेच मंडळाचे संगणक गटातील अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्रधारक कर्मचारी हे शासकीय सेवेसाठी आवश्यक असलेली संगणक अर्हता परीक्षा उत्तीर्ण असल्याचे समजण्यात येतात. त्यामुळे त्यांना शासकीय नोकरीसाठी त्याचा लाभ होतो. मंडळाचे वास्तूशास्त्र आरेखक (आर्किटेक्चरल ड्राफ्टसमन) व कन्स्ट्रक्शन सुपरवायझर हे दोन अभ्यासक्रम सार्वजनिक बांधकाम विभागातील ‘स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक’ या पाठ्यक्रमाशी समकक्ष म्हणून मान्यता मिळाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागातील नोकरीसाठी ग्राह्य धरण्यात येतात. तसेच जिल्हा परिषदेमधील कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक या पदावर नामनिर्देशनाने नियुक्ती करण्यासाठी मंडळाचा कन्स्ट्रक्शन सुपरवायझर हा अभ्यासक्रम समकक्ष समजला जातो. अशाप्रकारे मंडळाच्या विविध अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध लाभ होतात, अशी माहितीही मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -