घरमहाराष्ट्रMIM सोबत राहिलो तरी काँग्रेससाठी दरवाजे खुले - प्रकाश आंबेडकर

MIM सोबत राहिलो तरी काँग्रेससाठी दरवाजे खुले – प्रकाश आंबेडकर

Subscribe

भारिप बहुजन महासंघ एमआयएम सोबतच राज्यात निवडणुका लढवणार असल्याची घोषणा भारिप-बहुजन पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. तरिही आम्ही काँग्रेससोबत जाण्यास तयार असून त्यांच्यासाठी आजही दरवाजे खुले आहेत. निवडणुकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही काँग्रेसची वाट पाहू, असे म्हणत त्यांनी भाजप विरोधात काँग्रेस महाआघाडीला पांठिबा दिला आहे. मात्र असे असूनही आम्ही राष्ट्रवादीसोबत कधीच जाणार नाही. राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले हे संभाजी भिडेंची जाहीर बाजू मांडतात, त्यामुळे आम्ही त्यांचा प्रचार कसा करायचा? असा प्रश्न उपस्थित करत काँग्रेससोबत परिस्थितीनुसार काँग्रेससोबत आघाडी केली तरी राष्ट्रवादीशी आघाडी करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

शिवसेनेने बहुजनांना फक्त वापरले

एमआयएम यांच्यासोबत युती करण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांच्यावर सामानाच्या अग्रलेखातून टीका करण्यात आली होती. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना आंबेडकर म्हणाले की, शिवसेना आणि भाजपने वंचित बहुजनांना फक्त वापरले, त्याशिवाय त्यांच्यासाठी काहीच केलेले नाही. मुस्लिम जर वंचित समाजासोबत आले तर आपले वर्चस्व संपेल याची शिवसेनेसोबत सगळ्यांना भीती वाटते म्हणून ते आपल्यावर टीका करत असल्याचे आंबेडकर म्हणाले. आमच्या युतीचा सर्वात जास्त चटका शिवसेनेला बसला आहे. गेल्या ४० वर्षात माझ्यावर कधी अग्रलेख लिहिले गेले नाहीत, तेवढे गेल्या १५ दिवसांत लिहिले गेले असल्याचे आबंडेकर म्हणाले.

- Advertisement -

लोकांना फसवण्यासाठी भागवतांचा नवा डाव

भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या भूमिकेवर टीका केली आहे. मोहन भागवत लोकांना फसवण्याचा आणि आम्ही बदललो आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र संघाचे हे गॉस्पेल आहे. माझ्याकडे एक पुस्तक आह. ते संघाच्या शिबिरात आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये वाचायला दिले जाते. ‘We or Our Nationhood Defined’ असे या पुस्तकाचे नाव आहे. या देशात हिंदू हा राष्ट्रीय धर्म असून इतर धर्मांनी दुय्यम भूमिका स्वीकारावी, असे या पुस्तकात लिहिण्यात आली आहे. तर इतरांना किती दिवस या देशात ठेवावे याचा निर्णय हिंदुंनी घ्यावा आणि जे बाहेर जाणार नाहीत त्यांचा नरसंहार केला जाईल, अशी भाषा या पुस्तकात वापरण्यात आली असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

हे देखील वाचा – संघाच्या गोळवलकर गुरुजींचे ‘बंच ऑफ थॉट्स’ कालबाह्य?

या पुस्तकातील भागवतांच्या नव्या थिएरीचा आम्ही निषेध करतो. त्यांनी संविधानाची तत्वे मानलेली नाहीत. तर त्यांना गोळवलकर यांचे विचार मान्य आहेत, असे म्हणत आंबेडकरांनी भागवतांच्या विचारांवर टीका केली आहे. आम्ही सुपेरियर आहोत, अशी यांची भूमिका आहे. ते इथल्या कोणत्याही कायद्याला मानत नाहीत. साडेचार जिल्ह्याच्या जम्मू काश्मीरमध्ये देखील यांची भूमिका लोकांना मान्य नाही आहे. २६ जुलै १९४९ मध्ये गोळवलकर आणि सरदार पटेल यांच्यात करार झाला होता, त्यात भारताचे संविधान, झेंडा, स्वातंत्र्यदिन, राष्ट्रगीत संघाने मान्य केले. पण त्यांना हे मनापासून मान्य आहे का? हे त्यांनी स्पष्ट करावे असे आवाहन यावेळी आंबेडकरांनी भागवतांना दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -