घरक्रीडारविंद्र जडेजाचे एकदिवसीय संघात पुनरागमन

रविंद्र जडेजाचे एकदिवसीय संघात पुनरागमन

Subscribe

इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या कसोटीत अप्रतिम प्रदर्शन करणाऱ्या रविंद्र जडेजाचे भारतीय एकदिवसीय संघात पुनरागमन झाले आहे. हार्दिक पांड्या दुखापतीने आशिया चषकातून बाहेर गेल्याने जडेजाला संघात संधी देण्यात आली आहे.

भारताचा अष्टपैलू हार्दिक पांड्याला आशिया चषकातील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पाठीला दुखापत झाली. त्याला गोलंदाजी करत असताना ही दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला सामन्यात पुढे खेळता आले नव्हते. ही दुखापत इतकी गंभीर आहे की पांड्याला आता संपूर्ण आशिया चषकाला मुकावे लागणार आहे. त्याचप्रमाणे डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलही दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेला आहे. या दोघांच्या जागी दीपक चहार आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांना संघात संधी देण्यात आली आहे. तसेच मुंबईकर शार्दूल ठाकूरही स्पर्धेत यापुढे खेळू शकणार नाही. त्याच्याजागी सिद्धार्थ कौलची संघात निवड झाली आहे.

एक वर्षानंतर संघात पुन्हा संधी 

रविंद्र जडेजाचे एक वर्षानंतर भारतीय एकदिवसीय संघात पुनरागमन झाले आहे. त्याने जुलै २०१७ मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. पण इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या चार कसोटीत संधी मिळालेल्या जडेजाने पाचव्या कसोटीत खेळायला मिळताच अप्रतिम प्रदर्शन केले. त्याने या कसोटीत ७ विकेट घेतल्या आणि ८६ धावांची खेळीही केली. तसेच त्याने गेल्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्स संघाकडून चांगले प्रदर्शन केले होते. त्यामुळेच त्याचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे.

शार्दूल ठाकूरही दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर 

रविंद्र जडेजाबरोबरच वेगवान गोलंदाज दीपक चहार आणि सिद्धार्थ कौल यांनाही संघात संधी मिळाली आहे. हार्दिक पांड्या, अक्षर पटेल आणि शार्दूल ठाकूर हे तीन खेळाडू दुखापतीमुळे आशिया चषकात यापुढे भाग घेऊ शकणार नाही. दीपक चहार आणि सिद्धार्थ कौल या दोघांनीही इंग्लंड दौऱ्यात आपले आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -