Thursday, May 6, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र Weather Update : कोकण , विदर्भ, मराठवाड्यात येत्या ४ दिवसात अवकाळी पावसाची...

Weather Update : कोकण , विदर्भ, मराठवाड्यात येत्या ४ दिवसात अवकाळी पावसाची शक्यता – IMD

Related Story

- Advertisement -

राज्यात कोरोना संकट दिवसेंदिवस वाढत असतानाच अनेक जिल्ह्यांना आता अवकाळी पावसाचा फटका बसणार आहे. पुढील चार दिवसात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. एकीकडे विदर्भ, मराठवाड्यातील अनेक भागांत उन्हाचे तीव्र चटके सोसणाऱ्या बळी राजाला आता पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा फटका सहन करावा लागणार आहे. दरम्यान राज्यातील विविध भागात पुढील चार दिवस तुरळक पावसाचा सरी कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

सध्या मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात चक्रीय वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पूर्वमोसमी पावसाचे ढग तयार झाले आहेत. त्यामुळे मुंबई, ठाणे आणि कोकणासह राज्यातील सर्वच भागांत आजपासून पाच दिवस सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीटी आणि हलक्या पावसाचा सरी कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

- Advertisement -

जिल्ह्यानुसार अवकाळी पावसाची शक्यता

२७ एप्रिल (मंगळवार ) – सिंधुदुर्ग, पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, बीड, उस्मानाबाद, नांदेड, लातूर, हिंगोली, परभणी.

- Advertisement -

२८ एप्रिल (बुधवार)- पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड.

२९ एप्रिल (गुरुवार)- पुणे. सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड.

३० एप्रिल (शुक्रवार)- रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड.

१ मे( शनिवार)- रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, लातूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली.


 

- Advertisement -