घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरWeather Update : विदर्भाला 'अवकाळी'चा फटका! तर मुंबईपाठोपाठ मराठवाडाही गारठणार

Weather Update : विदर्भाला ‘अवकाळी’चा फटका! तर मुंबईपाठोपाठ मराठवाडाही गारठणार

Subscribe

मागील काही दिवसांपासून उत्तर भारतातील तापमानात घसरले आहे. आता उत्तर भारताबरोबरच महाराष्ट्रातील पाराही घसरला आहे. अशातच मुंबईचं तापमान मागील काही दिवसांपासून खाली आलं असून, यामुळे मुंबईकरांना वाढत्या गारठ्याचा सामना करावा लागत आहे.

मुंबई : पुढील 24 तासांत विदर्भ, मराठवाड्यातील हवामानात बदल होणार आहे. कारण, पुढील 24 तासांत राज्यात काही भागात पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला असून, विदर्भातील काही जिल्ह्यांना अवकाळीचा फटका बसणार आहे. तर मराठवाड्यात तापमान घटणार असल्याने मराठवाडा थंडीने कुडकुडणार आहे. (Weather Update Vidarbha hit by Avakali After Mumbai Marathwada will also get cold)

काही दिवसांपासून उत्तर भारतातील तापमानात घसरले आहे. आता उत्तर भारताबरोबरच महाराष्ट्रातील पाराही घसरला आहे. अशातच मुंबईचं तापमान मागील काही दिवसांपासून खाली आलं असून, यामुळे मुंबईकरांना वाढत्या गारठ्याचा सामना करावा लागत आहे. मुंबईतील किमान तापमान 14.8 अंश सेल्सिअसवर पोहोचलं आहे. मुंबई यंदाच्या मौसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. यासोबतच रत्नागिरीत किमान तापमान 17.1 अंश सेल्सिअस तर डहाणूत तापमान 15.3 अंश सेल्सिअसवर पोहोचलं आहे. माथेरानमध्ये तापमान 15.8 अंश सेल्सिअसवर गेलं आहे. यासोबतच, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शहरांमधील तापमानात घट झाल्याचं दिसून येत आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Anil Deshmukh : विरोधी पक्षातील नेत्यांना लक्ष्य केलं जातंय – अनिल देशमुख

पूर्व विदर्भात अवकाळीचा फटका

पुढील 24 तासांत विदर्भात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असली तर पूर्व विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मंगळवारी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडला. अशातच दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण दिसून येत होतं, अशातच मंगळवारी सकाळी अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे गहु, हरभरा या पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. तर सध्या रब्बी हंगामाच्या भात पिकाची लागवड सुरू असून, भात पिकाला फायदा होणार आहे. यासोबतच गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुढील काही दिवसात पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. अवकाळी पावसामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. धुळयात तापमानाचा पारा 7 अंशावर पोहोचला आहे. तापमानाचा पारा घसरल्याने कडाक्याच्या थंडीत वाढ झाली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Loksabha Election : महाविकात आघाडीच्या जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय गुरुवारी – संजय राऊत

कोकणसह मराठवाडाही गारठणार

देशासह राज्यातील तापमानात मोठी घट झाली आहे. गेल्या काही दिवसात कोकणात किमान तापमानात मोठी घट झाली आहे. पुढील दोन दिवसांत राज्यात मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात तापमानात घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -