घरदेश-विदेशWeather Updates : उत्तरेतील हिमवृष्टीचा महाराष्ट्राच्या वातावरणावर परिणाम; आणखी हुडहुडी वाढणार

Weather Updates : उत्तरेतील हिमवृष्टीचा महाराष्ट्राच्या वातावरणावर परिणाम; आणखी हुडहुडी वाढणार

Subscribe

हवामान खात्याने बुधवारी बहुतांश ठिकाणी दाट धुके आणि जोरदार वाऱ्यासह हलका पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली आहे. बुधवारी दिल्लीत किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 10 अंश सेल्सिअस आणि 19 अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.

मुंबई : जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये हिमवृष्टी सुरू असून दिल्लीत गेल्या 13 वर्षातील थंडीचा विक्रम मोडला गेला आहे. दिल्लीत या महिन्यात 30 जानेवारीपर्यंत सरासरी कमाल तापमान 17.7 अंश सेल्सिअस होते, जे 13 वर्षांतील सर्वात कमी तापमान असल्याची नोंद झाली आहे. याचदरम्यान उत्तरेकडील हिमवृष्टीमुळे महाराष्ट्राच्या वातावरणावर थेट परिणाम होताना दिसत असून, पुढील काही दिवसांत महाराष्ट्रात आणखी हुडहुडी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Weather Updates Effect of snowfall in North on Maharashtras atmosphere More hoodoos will increase)

हवामान खात्याने बुधवारी बहुतांश ठिकाणी दाट धुके आणि जोरदार वाऱ्यासह हलका पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली आहे. बुधवारी दिल्लीत किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 10 अंश सेल्सिअस आणि 19 अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

दरम्यान लागोपाठ येणाऱ्या तीन पश्चिमी झंजावाताच्या साखळीतून संपूर्ण उत्तर भारत पुन्हा ओला होणार. सध्या तेथे पडत असणाऱ्या धुके व हिमवृष्टीबरोबरच पावसाची शक्यताही निर्माण झाली. त्यामुळे रविवारपर्यंत थंडी वाढण्याची शक्यता आहे. सध्या महाराष्ट्रात पडत असलेली थंडी अजून अशीच 1 फेब्रुवारीपर्यंत जाणवण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

हेही वाचा : Anil Babar Passed Away : आमदार अनिल बाबर यांचं निधन; मुख्यमंत्री शिंदेंचे विश्वासू अशी ओळख

- Advertisement -

2 ते 3 डिग्री सेल्सिअसने घटणार तापमान

राज्यात पुढील काही दिवस तापमानात मोठी घट होणार आहे. साधारणत: 2 ते 3 डिग्री सेल्सिअसने तापमानात घट होण्याचा अंदज पुणे वेध शाळेने वर्तवला आहे. यामुळे विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्रात 4 फेब्रुवारीपर्यंत थंडी वाढणार आहे. यानंतर थंडी हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात नाशिक, पुणे, जळगाव, नागपूर, अमरावती, गोंदिया जिल्ह्यात कमी तापमानाची नोंद झाली आहे. तर मुंबईत देखील फेब्रुवारी महिन्यात तापमानात पुन्हा कमी होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : Maratha Reservation Survey : मराठा समाज सर्वेक्षणाला शुक्रवारपर्यंत मुदतवाढ; कर्मचाऱ्यांची लगबग वाढली

पुढील काही दिवसांत पुणेही गारठणार

पुण्यात 1 ते 4 फेब्रुवारी दरम्यान आकाश मुख्यतः निरभ्र राहून वेळोवेळी ते अंशत: ढगाळ होण्याची शक्यता आहे. पुढील दोन-तीन दिवस किमान तापमानात अंदाजे तीन डिग्रीने घट होण्याची शक्यता आहे व कमाल तापमानातही दोन ते तीन डिग्रीने घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढे दोन-तीन दिवस दिवसा थंडी जाणवणार आहे. पुण्यानंतर मुंबईतून थंडी गायब झाल्या सारखी परिस्थिति असली तरी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत तापमानाचा पारा खाली उतरण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -