घरमहाराष्ट्रपुणेMLA Anil Babar : शिवसेना आमदार अनिल बाबर यांचं निधन

MLA Anil Babar : शिवसेना आमदार अनिल बाबर यांचं निधन

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या बाजुने गेलेले आमदार अनिल बाबर हे ठाकरे गटाकडून अपात्रतेप्रकरणाच्या यादीत पहिल्या क्रमांकवर होते.

सांगली : शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं आज बुधवारी (31 जानेवारी) अल्पशा आजाराने निधन झालं. ते 74 वर्षांचे होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू म्हणून आमदार अनिल बाबर यांची ओळख होती. तब्येत खालावल्यामुळे त्यांना काल उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले होते. दरम्यान त्यांची आज प्राणज्योत मालवली. (Anil Babar passed away MLA Anil Babar passed away Identified as Chief Minister Shindes confidant)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या बाजूने गेलेले आमदार अनिल बाबर हे ठाकरे गटाकडून अपात्रतेप्रकरणाच्या यादीत पहिल्या क्रमांकवर होते. अनिल बाबर हे 2019 मध्ये शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले होते. त्यांनी अपक्ष उमेदवार सदाशिव पाटील यांचा पराभव केला होता. आमदार अनिल बाबर चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. 1990, 1999, 2014, 2019 असे चार वेळा ते आमदार राहिलेत.

- Advertisement -

हेही वाचा : Budget 2024 : अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी ठोस आर्थिक तरतूद करा; किसान सभेची मागणी

टेंभू योजनेत मोलाचा वाटा

खानापूर-आटपाडी हा मतदारसंघ म्हणजे अवर्षणग्रस्त मतदारसंघ. या भागात बारोमास दुष्काळसदृश्य परिस्थिचा सामना या भागातील नागरिकांना करावा लागतो. तेव्हा ही दुष्काळाची ओळख पुसून टाकण्यासाठी आमदार अनिल बाबर यांनी जायकवाडी प्रकल्पातून पाणी खेचून आणता येईल, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. या योजनेला त्यांनी टेंभू योजना असे नाव दिले.

- Advertisement -

हेही वाचा : Maratha Reservation Survey : मराठा समाज सर्वेक्षणाला शनिवारपर्यंत मुदतवाढ; कर्मचाऱ्यांची लगबग वाढली

आमदार अनिल बाबर यांचा अल्परिचय

शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचा जन्म 7 जानेवारी 1950 रोजी झाला. त्यांनी 1972 साली वयाच्या 22 व्या वर्षापासून त्यांच्या राजकीय जीवनाला सुरुवात केली. जिल्हा परिषद सदस्य ते आमदार असा त्यांचा प्रवास होता. सर्वातआधी ते 1990 साली आमदार म्हणून ते विधानसभेवर निवडून गेले. 1982 ते 1990 खानापूर पंचायत समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -