घरमहाराष्ट्रपुणेCM Eknath Shinde : आमदार बाबर यांच्या निधनावर मुख्यमंत्री शिंदेंकडून शोक व्यक्त;...

CM Eknath Shinde : आमदार बाबर यांच्या निधनावर मुख्यमंत्री शिंदेंकडून शोक व्यक्त; आटपाडीलाही जाणार

Subscribe

आमदार अनिल बाबर यांच्या निधनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला. एवढंच नव्हे तर आज होणारी राज्य मंत्रिमंडळाची बैठकही रद्द करण्यात आली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दुपारी आमदार अनिल बाबर यांच्या पार्थिवाच्या दर्शनासाठी आटपाडीला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई : शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं आज बुधवारी (31 जानेवारी) अल्पशा आजाराने निधन झालं. ते 74 वर्षांचे होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू म्हणून आमदार अनिल बाबर यांची ओळख होती. आमदार अनिल बाबर यांच्या निधनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला. एवढंच नव्हे तर आज होणारी राज्य मंत्रिमंडळाची बैठकही रद्द करण्यात आली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दुपारी आमदार अनिल बाबर यांच्या पार्थिवाच्या दर्शनासाठी आटपाडीला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. (CM Eknath Shinde Condolences from Chief Minister Shinde on the death of MLA Babar Will also go to Atpadi)

सत्तांतरानंतर ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या बाजूने गेलेले आमदार अनिल बाबर हे 2019 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते. आमदार अनिल बाबर चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. 1990, 1999, 2014, 2019 असे चार वेळा ते आमदार राहिलेत. त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट X वर पोस्ट करत शोक व्यक्त केला. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की, खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने आपण खऱ्या अर्थाने शिवसेनेचा समाजकार्याचा वसा चालवणारा एक अतिशय प्रभावी असा लोकप्रतिनिधी गमावला आहे. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्या असल्याची माहितीही त्यांनी पोस्टमधून दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Anil Babar Passed Away : आमदार अनिल बाबर यांचं निधन; मुख्यमंत्री शिंदेंचे विश्वासू अशी ओळख

- Advertisement -

बाबर यांनी केलेलं काम न विसरण्याजोग

पुढे पोस्टमध्ये लिहिले की, खानापूर आटपाडी मतदारसंघांमध्ये त्यांनी शिवसेनेचे केलेले कार्य कधीही न विसरण्याजोगे आहे. बेघरांना घरे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे किंवा रक्तदान शिबिरांचे आयोजन, कृष्णा खोऱ्यातील पाणी आणि टेंभू योजना कार्यान्वित व्हावी म्हणून केलेले प्रयत्न असो किंवा शिक्षण संस्थांच्या माध्यमातून शिक्षणाचा तळागाळापर्यंत केलेला प्रसार असो, अनिल बाबर यांनी एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून काम केले. खानापूर आटपाडी भागामध्ये शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी अनिल बाबर हे कायम एका लढाऊ वृत्तीने लढले. त्यांनी या भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यांच्या निधनाने शिवसेनेचा एक ज्येष्ठ लोकप्रतिनिधी, माझा जवळचा सहकारी आणि मार्गदर्शक आम्ही गमावला आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो तसेच बाबर कुटुंबातील सदस्यांना या दुःखातून सावरण्याकरता बळ देवो हीच प्रार्थना करत मुख्यमंत्री शिंदे यांनी बाबर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

हेही वाचा : Lalit Teckchandani Arrested : बांधकाम व्यावसायिक ललित टेकचंदानी याला अटक

एक संवेदनशील लोकप्रतिनिधी आपण गमावला

आमदार अनिल बाबर यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शोक व्यक्त केला आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की, विधानसभा सदस्य अनिल बाबर यांच्या अकस्मात निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांच्या निधनाने एक संवेदनशील लोकप्रतिनिधी आपण गमावला आहे. वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी ते सरपंच म्हणून निवडून आले. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य ते 4 वेळा विधानसभा सदस्य अशी प्रदीर्घ त्यांची राजकीय कारकिर्द राहिली. मतदारसंघातील प्रश्न घेऊन ते सातत्याने भेटत असत. त्यांचे असे अकस्मात आपल्यातून निघून जाणे, मनाला अत्यंत वेदनादायी आहे. अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे.

खा. सुप्रिया सुळेंकडूनही शोक व्यक्त

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आमदार अनिल बाबर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट X वर पोस्टमध्ये लिहिले की, खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद आहे. त्यांच्या निधनामुळे बाबर कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -