घर महाराष्ट्र मोदींनी जग जिंकून काय फायदा? मराठा आरक्षणावरून ठाकरे गटाचा मुख्ममंत्र्यांवर निशाणा

मोदींनी जग जिंकून काय फायदा? मराठा आरक्षणावरून ठाकरे गटाचा मुख्ममंत्र्यांवर निशाणा

Subscribe

मुंबई : ‘जी-20’ परिषदेची यशस्वी सांगता झाल्याचे सरकारतर्फे जाहीर करण्यात आले. ‘जी-20’ दिल्लीत यशस्वी होणे ही नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. अंगत-पंगत नक्कीच छान जमली. यजमान मोदी यांनी पाहुण्यांचे आगत स्वागत छान केले. भारत मंडपमही दिमाखदार होता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदेही पंगतीत सामील झाले. पंगत संपल्यावर मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘व्वा! व्वा! मोदींनी जग जिंकले!’’ पण जालन्यात मराठा समाजासाठी प्राण पणास लावणाऱ्या मनोज जरांगे-पाटलांच्या पोटात पंधरा दिवसांपासून अन्नाचा कण नाही. मोदींनी जग जिंकून काय फायदा? असा बोचरा सवाल ठाकरे गटाने केला आहे.

हेही वाचा – आमदार रवी राणा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न; ठाकरे गटाकडे दाखवले बोट

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व परदेशी पाहुण्यांना रात्रीचे जेवण दिले. त्या ‘डिनर’साठी काँग्रेस अध्यक्ष तसेच विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे सोडून सगळ्यांना बोलावले. एक प्रकारे ते भव्य अशा गावजेवणाचेच निमंत्रण होते. राज्यांचे मुख्यमंत्री त्यात सहभागी होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जागतिक जेवणावळीचे निमंत्रित होते. जेवण झाल्यावर शिंदे यांनी ढेकर दिला की, ‘‘पंतप्रधान मोदींनी जग जिंकले.’’ शिंदे म्हणतात त्याप्रमाणे ‘जी-20’च्या निमित्ताने मोदी यांनी जग जिंकले असेल तर आनंदच आहे. भारतासाठी ही गौरवाचीच बाब आहे, पण मोदी जग जिंकत असताना देशात मणिपूर आजही पेटलेले आहे व मणिपूरच्या जनतेची मने मोदी जिंकू शकलेले नाहीत, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातील अग्रलेखात करण्यात आली आहे.

हेही वाचा – सरकार दरवर्षी फक्त आश्वासन देतात; संभाजीराजेंच्या आरोपावर मुख्यमंत्री म्हणाले…

- Advertisement -

मोदींनी जग जिंकले, पण चीनने लडाखची जमीन गिळली आहे व त्या जमिनीवरून मोदी चिन्यांना मागे ढकलू शकलेले नाहीत. तेव्हा जग जिंकत असताना आपल्या देशात काय जळते ते आधी पाहणे गरजेचे आहे. पुन्हा जिंकलेल्या जगात भारत आहे की नाही? हा प्रश्नही आहेच. आज जग भारताने जिंकले. पुढच्या ‘जी-20’च्या वेळी यजमान असलेला ब्राझील जग जिंकेल. जग जिंकण्याचा चषक असाच फिरत राहील व जग जिंकण्याची अशी संधी नेपाळ, बांगलादेश, म्यानमार, सिंगापूरलाही मिळेल, अशी खोचक टीका ठाकरे गटाने केली आहे.

भारताकडे नोव्हेंबर 2023 पर्यंत ‘जी-20’चे अध्यक्षपद राहील. त्यानंतर ‘जी-20’चे यजमानपद ब्राझीलकडे जाईल. भारतात सोहळा होण्याआधी हा मान इंडोनेशियाकडे होता. म्हणजे ‘जी- 20’चा फिरता चषक हा या देशातून त्या देशात फिरत असतो, असे या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.

- Advertisment -