Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र भाजपा नेत्यांना अनुदान सोडण्यास कधी सांगणार? काँग्रेस नेते सचिन सावंत यांचा सवाल

भाजपा नेत्यांना अनुदान सोडण्यास कधी सांगणार? काँग्रेस नेते सचिन सावंत यांचा सवाल

Subscribe

मुंबई : एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला गॅस सबसिडी सोडा, असे म्हणतात आणि जनतेचे कोट्यवधी रुपये केंद्रीय योजनांच्या अनुदानाच्या रुपाने भाजपा नेत्यांच्या नातेवाईकांना वाटतात. इथे राष्ट्रवाद आणि परिवारवाद मोदीजींना दिसत नाही. हा विरोधाभास भाजपाचा आणि मोदीजींचा खरा चेहरा दर्शवतो, अशी टीका करत आता जनतेला गॅस सबसिडी सोडा असे सांगणारे पंतप्रधान भाजप नेत्यांना अनुदान सोडण्यासाठी कधी सांगणार? असा सवाल प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी शुक्रवारी केला.

हेही वाचा – खुशखबर! कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफी राज्य सरकारचा निर्णय

- Advertisement -

केंद्राच्या किसान संपदा यॊजनते आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांची कन्या, आसामचे मुख्यमंत्री हेमंतकुमार विश्वसरमा यांची पत्नी लाभार्थी ठरल्या आहेत. यावरून सावंत यांनी भाजपावर टीका केली. पंतप्रधान मोदी सातत्याने विरोधी पक्षांच्या घराणेशाही आणि भ्रष्टाचारावर तोंडसुख घेत असतात. पण त्यांना स्वतःच्या पक्षातील घराणेशाही आणि भ्रष्टाचार दिसत नाही. किसान संपदा योजनेची लाभार्थी भाजपानेते विजयकुमार गावित यांची मुलगी आणि आसामचे मुख्यमंत्री हेमंतकुमार विश्वसरमा यांची पत्नी आहेत. हा आर्थिक परिवारवाद मोदींना दिसत नाही का? शेतकरी मजूबत करण्यासाठीच्या योजनेतून भाजपाचे नेतेच मजबूत होत आहेत, अशी टीका सचिन सावंत यांनी केली आहे.

- Advertisement -

किसान संपदा योजनेतून कंपन्याना अनुदान दिले जाते. पण या योजनेतून मंत्री विजयकुमार गावित यांची मुलगी आणि आसामचे मुख्यमंत्री यांची पत्नी यां दोघींना प्रत्येकी 10 कोटी रुपयांचा लाभ झाला आहे. हा एकप्रकारचा परिवारवादच आहे. सरकारने सर्वसामान्य जनतेतून उद्योजक निर्माण केले पाहिजेत, अशी अपेक्षा असताना इथे मात्र भाजपा नेत्यांचीच घरभरणी होत आहे, असेही सावंत यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – मागील 9 वर्षांत पत्रकार परिषद न घेणारे पंतप्रधान मोदीच खरे घमंडिया, काँग्रेसची टीका

पंतप्रधान मोदी यांनी ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’ अशी घोषणा केली होती. पण त्यांच्याच पक्षातील लोक भरपूर खातात. त्याकडे मोदींचे लक्ष का जात नाही? शेतकऱ्यांसाठी या योजनेचा लाभ होऊन त्यांचे उत्पन्न वाढले पाहिजे. मात्र, मोदी सरकारच्या काळात शेतकरी दिवसेंदिवस संकटातच सापडत आहे. शेतकरी उपाशी आणि भाजपा नेत्यांचे नातेवाईक मात्र तुपाशी असा हा प्रकार असून शेतकऱ्यांच्या नावाखाली भाजपा नेत्यांचे नातेवाईकच लाभ उठवत आहेत, असे सावंत यांनी म्हटले आहे.

- Advertisment -