घरमहाराष्ट्रपावसाळी अधिवेशन 2023मराठी कलाकारांवर अन्याय करणारा हिंदी कलाकार कोण? प्रसाद लाड यांची चौकशीची मागणी

मराठी कलाकारांवर अन्याय करणारा हिंदी कलाकार कोण? प्रसाद लाड यांची चौकशीची मागणी

Subscribe

मराठी कला दिग्दर्शकावर अन्याय करणारा तो हिंदी कलाकार कोण होता? याची चौकशी करा, अशी आग्रही मागणी आमदार प्रसाद लाड यांच्याकडून करण्यात विधान परिषदेत केली. नितीन देसाई यांच्या आत्महत्येच्या प्रकरणावर बोलताना लाड यांनी मागणी केली.

Maharashtra Monsoon Session 2023 : ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी काल बुधवारी (ता. 02 ऑगस्ट) त्यांच्या कर्जत येथील एन.डी. स्टुडिओमध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घडली. त्यांनी आर्थिक विवंचनेतून आपल्या जीवनाचा प्रवास संपविल्याचे बोलण्यात येत आहे. नितीन देसाई यांच्या आत्महत्येचा मुद्दा पावसाळी अधिवेशनाच्या दोन्ही सभागृहात उपस्थित करण्यात आला. या प्रकरणी सखोल चौकशी करून एन. डी. स्टुडिओबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आले. विधान परिषदेत देखील आमदार प्रवीण दरेकर, आमदार भाई जगताप, आमदार प्रसाद लाड आणि आमदार सचिन अहिर यांनी या प्रकरणी अवचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून या प्रकरणावर चर्चा केली. मराठी कला दिग्दर्शकावर अन्याय करणारा तो हिंदी कलाकार कोण होता? याची चौकशी करा, अशी आग्रही मागणी आमदार प्रसाद लाड यांच्याकडून करण्यात विधान परिषदेत केली. (Who is the Hindi artist who did injustice to Marathi artists? Demand for inquiry of Prasad Lad)

हेही वाचा – करोडपती कर्ज घेऊन पळून जातात, पण…. नितीन देसाईंच्या आत्महत्येप्रकरणी प्रवीण दरेकरांनी सांगितला ‘तो’ किस्सा

- Advertisement -

विधान परिषदेत आज ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येबाबत चर्चा करत त्यांनी केलेल्या दर्जेदार कामांना उजाळा देण्यात आला. यावेळी आमदार प्रसाद लाड यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी बोलताना ते म्हणाले की, नितीन देसाई यांच्याशी संबंधित असलेल्या 11 ध्वनिफितींपैकी एका ध्वनिफितींची चौकशी झाली पाहिजे, कारण त्या हिंदी कलाकारासोबत झालेल्या वादामुळे देसाई यांना काम मिळणे बंद झाले होते. त्यामुळे तो हिंदी कलाकार कोण होता, जो मराठी कलाकारांवर अन्याय करत होता, त्याची चौकशी झाली पाहिजे, अशा मागणी प्रसाद लाड यांनी केली.

तसेच, फिल्मसिटीमध्ये सुरू असलेल्या या दहशतवादाची चौकशी करून तो थांबवला पाहिजे. याकडे देखील शासनाने लक्ष दिले पाहिजे, असेही प्रसाद लाड यांच्याकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे सरकारने इडलवाईस आणि हिंदी कलाकाराची चौकशी करावी. तर नितीन देसाई यांच्या कुटुंबियांना विश्वासात घेऊन सरकारने एन. डी. स्टुडिओ ताब्यात घ्यावा, ही विनंती प्रसाद लाड यांच्याकडून सरकारला करण्यात आली आहे.


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -