घरमहाराष्ट्रनागपूरWinter Session : दानवेंच्या आरोपानंतर भाजपाच्या मंत्र्याने खिशातून काढला राजीनामा अन् गोऱ्हेंनी...

Winter Session : दानवेंच्या आरोपानंतर भाजपाच्या मंत्र्याने खिशातून काढला राजीनामा अन् गोऱ्हेंनी लगावला टोला

Subscribe

नागपूर : विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी भाजपा मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांच्यावर 260 व अंतिम आठवड्या प्रस्तावावर मांडताना भ्रष्टचाराचे आरोप केले. यानंतर आरोपाचे खंडन करताना मंगल प्रभात लोढा यांनी कोऱ्या कागदावर राजीनामा देण्याची तयारी दाखवली. विधान परिषदेतील या गोंधलानंतर उपसभापती यांनी राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर लगावला टोला. (Winter Session BJP minister resigned from his pocket after the allegations of Ambadas danve and the Gores attacked him)

हेही वाचा – ‘त्या’ आरोपावर सुषमा अंधारेंनी दिलगिरी व्यक्त न केल्यास दाखल होणार हक्कभंग; उपसभापतींकडून स्पष्ट

- Advertisement -

मंगल प्रभात लोढा म्हणाले की, उपसभापती आपण आताच बोललात की, एकच गोष्ट तीन-तीन वेळा बोलली की, लोकांना ते सत्य वाटायला लागतं. आपण आता सभागृहात जी चर्चा करत आहोत, ती युट्युबवर जात आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी 260 व अंतिम आठवड्या प्रस्तावावर मांडताना माझं नाव घेतलं. आम्ही विरोध केल्यानंतर त्यांनी नाव काढायला सांगितलं. मात्र त्यापूर्वी ते युट्युबवर सर्व ठिकाणी पसरलं आहे. त्यानंतरही त्यांनी माझं नाव न घेता उत्लेख केला की, एक पालकमंत्री आणि भाजपाचे नेता. लोकांना असंच वाटेल की ते माझ्याबद्दल बोलत आहेत.

मात्र मी स्पष्ट करू इच्छितो की, मागील 10 वर्षांपासून माझ्या कुटुंबाच्या व्यवसायात मी नाही आहे. दुसरं म्हणजे माझ्या कुटुंबाचा व्यवसाय फक्त मुंबईत आहे असं नाही आहे. माझा मुलगा जगभरात काम करत आहे. तिसरं म्हणजे कुणी लीगल काम करून पैसा कमवत आहे, ते चांगलं आहे की, काही काम न करता आपण आरामात राहतात, ते चांगलं आहे. चौथं म्हणजे एकही बेकायदेशीर काम माझं कुटुंब करत असेल तर मी माझा कोरा राजीनामा आपल्याकडे जमा करतो, असे म्हणत त्यांनी थेट राजीनामा देण्याची तयारी दर्शविली.

- Advertisement -

हेही वाचा – Winter Session : अंगणवाडी सेविकांच्या वेतनवाढीवरून यशोमती ठाकूर आणि मंत्री गिरीश महाजनांमध्ये खडाजंगी

मंगल प्रभात लोढा म्हणाले की, मी तीस वर्षांपासून या विधान सभेचा सदस्य आहे. मी कधीच माझ्या पदाचा दुरुपयोग केला नाही. कुटुंबामध्ये कोणी व्यवसाय करायचा नाही का? घरी बसायचं, नोकरी करायची नाही, व्यवसाय करायचा नाही का? जर व्यवयसाय चांगला चालला तर त्यावर आक्षेप घेणे गरजेचं आहे का? असे प्रश्न उपस्थित करत मंगल प्रभात लोढा म्हणाले की, मी अंबादास दानवे यांचा व्यक्तिगत अतिशय सन्मान करतो. त्यामुळे मी त्यांना निवेदन करतो की, माझं कुटुंब बेकायदेशीर काम करत असेल तर त्यांनी पुरावे सादर करावेत. जर त्यांच्याकडे पुरावे नसतील त्यांनी कोणावर आक्षेप घेऊ नये.

अंबादास दानवे काय म्हणाले?

अंबादास दानवे म्हणाले की, मी त्याचं नाव मागे घेतलं आहे, पण त्यांचं म्हणणं असेल की, मी केलेल्या आरोपवर पुरावे सादर करावे तर मी द्यायला तयार आहे. यावर मंगल प्रभात लोढा म्हणाले की, तुम्ही सांगा कधी पुरावे देणार मी तुमच्याकडे येतो. उपसभापती हे सर्व थांबलं पाहिजे. कुणी माझ्यावर 1 रूपयाचा आक्षेप घेऊ शकत नाही.

हेही वाचा – Parliament Standoff : ‘ते’ राजकारण नाही तर गजकरण आहे, ठाकरे गटाची मोदी सरकारवर सडकून टीका

नीलम गोऱ्हे काय म्हणाल्या?

अंबादास दानवे यांचे आरोप आणि मंगलप्रभात लोढा यांच्या राजीनाम्यावर भाष्य करताना उपसभापती नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, आमदार खिशात राजीनामा घेऊन फिरतात मात्र कुणीच राजीनामा देत नाही. कुणी तो राजीनामा बाहेर काढत नाही. पण मंगल प्रभात लोढा तुम्ही राजीनामा बाहेर काढलात. असे असले तरी तुम्ही राजीनामा देऊ नका. अंबादास दानवे तुम्ही संबंधित यंत्रणेकडे तक्रार करा, असा सल्ला नीलम गोऱ्हे यांनी दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -