घरमहाराष्ट्रनागपूरWinter Session : "काय साहेब तुम्ही आमचा आवाज बंद केला", 'या' युवा...

Winter Session : “काय साहेब तुम्ही आमचा आवाज बंद केला”, ‘या’ युवा आमदाराचा अशोक चव्हाणांना टोला

Subscribe

नागपूर : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून (ता. 07 डिसेंबर) नागपुरात सुरुवात झाली आहे. यंदाचे हिवाळी अधिवेशन हे विविध मुद्द्यांवरून गाजणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळाले. पण विधिमंडळाच्या आवारात आमदारांमध्ये काही गंमतीशीर किस्से देखील घडले. एकीकडे शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांच्या आमदारकीवरुन ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी डिवचले, जे वैभव नाईक यांच्याकडून नेहमीच करण्यात येत असते. तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण आणि अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांच्यामध्ये टोलेबाजी पाहायला मिळाली. (Winter Session: Satyajeet Tambe’s response to Ashok Chavan’s question)

हेही वाचा – Winter Session : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून नाना पटोलेंनी सरकारवर डागली तोफ

- Advertisement -

नाशिक पदवीधर निवडणुकीच्यावेळी काँग्रेसमधील अंतर्गत वाद सर्वांच्या समोर आला होता. सत्यजित तांबे यांनी नाशिक पदवीधर निवडणूक ही काँग्रेसकडून लढण्याऐवजी अपक्ष लढणे पसंत केले. ज्यानंतर त्यांच्या वडिलांना म्हणजेच सुधीर तांबे यांना काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आले होते. ज्यामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद असल्याचे सर्वांना पाहायला मिळाले. त्यानंतर आज विधिमंडळाच्या आवारात काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि आमदार सत्यजित तांबे हे एकमेकांच्या समोर आले. त्यावेळी “काय सत्यजित आवाज देत नाहीस”, अशी विचारणा अशोक चव्हाण यांच्याकडून करण्यात आली. त्यावेळी त्यांना प्रत्युत्तर देत “काय साहेब तुम्ही आमचा आवाज बंद केला,” असे अशोक चव्हाणांना म्हटले. ज्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

सत्यजित तांबे यांना मोठा राजकीय वारसा लाभला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ न नेते असलेले बाळासाहेब थोरात हे सत्यजीत तांबे यांचे मामा आहेत. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सत्यजित तांबे विजयी झाल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी सुद्धा आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे भाचाला उमेदवारी न मिळाल्याने थोरात नाराज असल्याचे म्हटले गेले. पण या गोष्टीला काही काळानंतर पूर्णविराम लागला. सत्यजीत तांबे हे नाशिक पदवीधर मतदारसंघातून आमदार म्हणून विधानपरिषदेवर निवडून गेले आहेत. सत्यजीत तांबे यांनी काँग्रेसमधील घमासानानंतर अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा पाठिंबा असलेल्या शिवसेना उमेदवार शुभांगी पाटलांचा दारुण पराभव झाला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -