घरमहाराष्ट्रपुणे'लोकमान्य टिळकांप्रमाणे मोदींनी केलेली कामे लोकमान्य', मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधान मोदींचे तोंडभरून कौतुक

‘लोकमान्य टिळकांप्रमाणे मोदींनी केलेली कामे लोकमान्य’, मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधान मोदींचे तोंडभरून कौतुक

Subscribe

परदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव सन्मानाने घतले जाते आणि फ्रांन्स आणि अरब देशांनी पंतप्रधान मोदींना सर्वोच्च सन्मान दिला आहे, तेव्हा प्रत्येक भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून येतो, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हणाले.

पुणे | ‘लोकमान्य टिळकांप्रमाणे मोदींनी केलेली कामे लोकमान्य झाली आहेत’, असे म्हणत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कौतुकांचा वर्षावर केला आहे. पंतप्रधान मोदींना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे तौंडभरून कौतुक केले आहे. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे जेष्ठ नेते सुशील कुमार शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, टिळक कुटुंबीय आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, “लोकमान्य टिळक हे लोकांच्या मनातील भावना अचूक ओळखायचे आणि आजच्या काळात सामान्य माणसाचे मन ओळखणारे मोदी हे राष्ट्रीय स्थरावरील नेते ठरलेले आहेत. शिक्षक,वकील आणि स्वातंत्र्यसैनिक असलेले लोकमान्य टिळक हे बहुआयामी नेते होते. टिळकांना इतिहास,भूगोल आणि खगोलशास्त्र या विषयात त्यांचे प्रावीण्य होते. ते आपल्या कर्तृत्वाने लोकमान्य झाले होते. मोदींनी देखील 9 वर्षात देशासाठी केलेल्या कामांना लोकमान्यता मिळालेली आहे.

- Advertisement -

‘हा’ पुरस्कार मोदींच्या कामाची पावती

“टिळकांनी स्वराज्यसाठी लढा दिला. स्वातंत्र्यानंतर स्वराज्याचे सुराज्यात रुपांतर करण्यात आपल्याला यश आले आहे. हे सर्वांना माहिती आहे. मोदींनी ‘सबका साथ सबका विकास’ करण्याचा हा नारा दिला. सुराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्या दिशेने वाटचाल सुरू आहे. मोदींच्या कार्याच पोच पावती ही या पुरस्काराने होते.

हेही वाचा – Raj Thackeray : लोकमान्य टिळकांना अभिवादन करीत राज ठाकरेंनी राजकीय स्थितीवर ठेवले बोट

- Advertisement -

परदेशात पंतप्रधान मोदींचे सन्मान

परदेशात देखील पंतप्रधान मोदींचे नाव सन्मानाने घतले जाते. फ्रांन्स आणि अरब देशांनी पंतप्रधान मोदींना सर्वोच्च सन्मान दिला आहे. ही आपल्यासाठी गौरवाची बाब आहे. वेगवेगळ्या देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती किती मान देतात हे आपण पाहिले आहे. कोणी बॉस म्हणते, कोणी स्वाक्षरी घेते. कोणी त्यांची गळा भेट घेते तर कोणी त्यांच्या पाया पडते, अमेरिकेचे राष्ट्रपती you are global powerful, असे म्हणतात. तेव्हा भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून येतो, असे मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधांनाचे कौतुक केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -