घरमहाराष्ट्रनाशिकझेरॉक्सचे करणेही महागले

झेरॉक्सचे करणेही महागले

Subscribe

कागदाचे दर, ट्रान्सपोर्ट खर्च वाढल्याने दरवाढीचा

नाशिक : जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईनंतर दररोज कशाचे ना कशाचे दर वाढत आहेत. त्यात आता दूध, दही इतकेच काय शाळेच्या दप्तरातील पेन्सिल, खोडरबरवरही जीएसटी लागू झाल्याने दर वाढले आहेत. आता तर झेरॉक्सचेही दर वाढविण्यात आले आहेत. काही ठिकाणी ५० पैसे तर काही ठिकाणी एक रूपया दरवाढ करण्यात आली असून, १ ऑगस्टपासून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. कागदाचे वाढलेले दर, पेट्रोल दरवाढ परिणामी ट्रान्सपोर्टेशनचा वाढलेला खर्च यामुळे झेरॉक्सचे दर वाढवणे क्रमप्राप्त असल्याचे झेरॉक्स दुकानदारांनी सांगितले.

पूर्वी शहरात झेरॉक्स कमी दरात काढून देण्याची स्पर्धा होती. सरासरी एक रुपया दर असताना ५० पैसे आणि ७५ पैशांत झेरॉक्स काढून दिली जाईल, अशा पाट्या दुकानांवर दिसून येत. गेल्या काही वर्षांत मात्र, ही स्पर्धा बंद होऊन सरसकट भाववाढ झाल्याचे दिसून येते. झेरॉक्स दुकानांची संख्या वाढली, तसे ग्राहकही वाढलेच आहेत. विविध कामांसाठी आता झेरॉक्स आवश्यकच बनल्या आहेत. मात्र, त्यासाठी आता ग्राहकांना जादा पैसे मोजावे लागत असल्याचे दिसून येते. या भाववाढीसंबंधी एकसमान सूत्रही नसल्याचे दिसून येते.

- Advertisement -

झेरॉक्ससाठी लागणार्‍या कागदाचे दर वाढले म्हणून झेरॉक्स प्रतीची दरवाढ करण्यात आली आहे. साधारणपणे ५० पैसे ते १ रूपयांपर्यंत दर वाढविण्यात आले आहेत. झेरॉक्स व्यावसायिकांची संघटना नसल्याने दरावरही कोणाचेही नियंत्रण नाही. त्यात गुजरातमधील व्यावसायिकांनी नाशिकमध्ये झेरॉक्स व्यवसायात जम बसवल्याने हे व्यावसायिक आपापसांत दरांबाबत धोरण ठरवत असल्याचे दिसून येते त्यामुळे शहरात वेगवेगळया भागात दरांमध्येही तफावत दिसून येत आहे.

३० कॉपीला २ रूपये

काही दुकानदार मात्र एक रुपयाच घेतात. त्यांच्या म्हणण्यानुसार, दर वाढवले तर ग्राहक कमी होऊन त्याचा परिणाम धंद्यावर होईल म्हणून आम्ही थोडे दिवस वाट पहात आहोत. त्यामुळे १ ते ३० कॉपीसाठी २ रूपये तर ३० पेक्षा अधिक कॉपी झेरॉक्स कराचयाचे असतील तर दीड रूपया दर आकारला जात आहे.

- Advertisement -

टोनरमुळे स्वस्त झेरॉक्स

काही दुकानदार ३० ते ४० हजार रूपयांमध्ये आरसी मशीन खरेदी करतात. त्यात सातशे ते आठशे रूपयांचे टोनर बसवले की स्वस्त दरात झेरॉक्स काढून देणे या दुकानदारांना परवडते. त्यामुळे काही दुकानदार स्वस्त दरात झेरॉक्स काढून देत व्यावसायात स्पर्धा निर्माण करत असल्याचे काही व्यावसायिकांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -