घरमुंबईदहावी-बारावीचा निकाल वेळेवर लागणार

दहावी-बारावीचा निकाल वेळेवर लागणार

Subscribe

दहावी आणि बारावीचा निकाल वेळेवर लागणार आहे. करोनाला न जुमानता शिक्षकांकडून पेपर तपासणी जोरात सुरु आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरळीतपणे घेण्यात येत असताना निकाल वेळेवर लागेल का याबाबत पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनात शंका होती. मात्र पेपर तपासणीवर करोनाचा कोणताच परिणाम झालेला नसून, पेपर तपासणीचे काम जोरात सुरू आहे. त्यामुळे दहावी आणि बारावीचे निकाल वेळेतच जाहीर होतील, असा विश्वास राज्य मंडळातील अधिकारी व्यक्त करत आहेत. करोनाच्या वाढत्या प्रभावामुळे सीबीएसई आणि आयसीएसईकडून दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

शिक्षकांना घरी पेपर तपासणीची मुभा देण्याची मागणी

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून सुरक्षेची काळजी घेत दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरळीत घेण्यात येत आहेत. सर्वत्र कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू लागल्याने सरकारने उपाययोजना म्हणून शाळा, कॉलेजांना सुट्टी जाहीर केली असल्याने शिक्षकांनाही सुट्टी देण्याची मागणी शिक्षकांकडून होत आहे. मात्र शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. शाळांमध्ये शिक्षक दहावी, बारावीचे पेपर तपासणीचे काम करत आहेत. पेपर झाल्यानंतर दोन दिवसांनंतर पेपर शाळांमध्ये येत आहेत. आणि शिक्षकही त्याच तत्परतेने पेपर तपासत आहेत. त्यामुळे करोनाचा पेपर तपासणीवर कोणताही परिणाम झालेला नाही. मात्र, शिक्षकांना सुट्टी देऊन पेपर तपासणार्‍या शिक्षकांना घरी पेपर तपासणीची मुभा देण्याची मागणीही मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे सचिव प्रशांत रेडीज यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -