घरताज्या घडामोडीमंत्रालयातील कार्यालयांमध्ये बैठका आयोजित करु नका

मंत्रालयातील कार्यालयांमध्ये बैठका आयोजित करु नका

Subscribe

मंत्रालयात नियंत्रण कक्ष स्थापन करणार

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, आता करोना विषाणूचा प्रदूर्भाव पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच इतर कार्यालयांनी बैठका आयोजित करू नयेत, असे आदेश सामान्य प्रशासन विभगाने गुरूवारी जारी केले आहेत. त्यामुळे मंत्रालयातील सरकारी बैठकांवर निर्बंध आले आहेत. करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मंत्रालयात सर्वसामान्य जनतेला प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तसेच मंत्रालयातील कर्मचार्यांची उपस्थिती ५० टक्क्यांवर आणली आहे.


हेही वाचा – केईएमची लॅब करणार कस्तुरबाचा भार हलका; तपासणी काळ होणार कमी

- Advertisement -

आता मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच त्यांच्या अखत्यारीतीतील कार्यालयांनी शक्यतो बैठकीचे आयोजन करू नये. महत्त्वाच्या बैठका आयोजित करण्याची गरज असेल तरच बैठका आयोजित कराव्यात. तसेच विषाणूचा संसर्ग टाळण्याच्या दृष्टीकोनातून बैठकीला उपस्थित राहणारे अधिकारी आणि कर्मचारी यांचा एकमेकांशी संपर्क होणार नाही अशा प्रकारे एक आसन सोडून पुरेसे अंतर ठेवण्याची दक्षता घ्यावी, अशी सूचना सामान्य प्रशासन विभागाने केली आहे.

मंत्रालयात नियंत्रण कक्ष

दरम्यान, कोरोना विषाणूमुळे उद्भवणाऱ्या संसर्गजन्य आजारामुळे आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी मंत्रालयात सहाव्या मजल्यावर ६०३ क्रमांकाच्या दालनात राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष उघडण्यात आला आहे. या नियंत्रण कक्षाची जबाबदारी अतिरिक्त मुख्य आयुक्त राजीव जलोटा, प्रधान सचिव भूषण गगराणी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -