घरताज्या घडामोडीकरोना अपडेट - राज्यात ४८ करोना पॉझिटिव्ह, मुंबईत ९ जणांवर उपचार

करोना अपडेट – राज्यात ४८ करोना पॉझिटिव्ह, मुंबईत ९ जणांवर उपचार

Subscribe

राज्यात बाधित भागातून आलेल्या एकूण १३०५ प्रवाशांपैकी ४४२ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे. तसंच आज पर्यंत विलगीकरण कक्षात १०३६ जणांना भरती करण्यात आले आहे.

राज्यात गुरुवारी आणखी एका करोना बाधित रुग्णाची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ४८ झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील ५१ वर्षीय पुरुष करोना बाधित आढळला असून तो आपल्या पत्नीसह दुबईला गेला होता. त्याची पत्नी करोना निगेटिव्ह आढळली आहे.

राज्यात गुरुवारी ७८ संशयित रुग्णांना भरती करण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत बाधित भागातून एकूण १ हजार ३०५ प्रवासी आले आहेत. १८ जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत १०३६ जणांना भरती करण्यात आले आहे. आज पर्यंत भरती करण्यात आलेल्यांपैकी ९७१ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करिता निगेटिव्ह आले आहेत तर ४८ जण पॉझिटिव्ह आले आहेत.

- Advertisement -

नवीन करोना विषाणू आजार प्रतिबंध आणि नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण स्थापन करण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार सर्व देशातील प्रवाशांची तपासणी विमानतळावर करण्यात येऊन त्यातील लक्षणे असणाऱ्या प्रवाशांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात येत आहे. बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण १३०५ प्रवाशांपैकी ४४२ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे.

तर, मुंबईत गुरुवारी उल्हासनगरमधील ४७ वर्षीय महिलेची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ही महिला दुबईहून परतली होती. तर, मुंबईतल्या २२ वर्षीय तरुणीलाही करोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. ही तरुणी युकेवरुन प्रवास करून आली होती. त्यानुसार, राज्यातला करोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून करोना विषाणूचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या ४८ झाली असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

जिल्हा/मनपा – बाधित रुग्ण – मृत्यू

- Advertisement -

१ पिंपरी चिंचवड मनपा – ११ – ०
२ पुणे मनपा – ८ – ०
३ मुंबई – ९ – १
४ नागपूर – ४ – ०
५ यवतमाळ, नवी मुंबई, कल्याण – प्रत्येकी ३ – ०
६ अहमदनगर – २ – ०
६ रायगड, ठाणे, उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी – प्रत्येकी १ – ०
एकूण ४८ मृत्यू – १

क्वॉरंटाईन केलेल्या प्रवाशांची संख्या १०९

तर, मुंबईत वेगवेगळ्या देशांतून क्वॉरंटाईन केलेल्या प्रवाशांची संख्या १०९ झाली आहे. सध्या सेव्हन हिल्समध्ये ९६ प्रवासी आणि मिराज हॉटेलमध्ये १३ प्रवासी क्वॉरंटाईन करण्यात आले आहेत. जसलोक आणि फोर्टिस या खासगी हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन वॉर्डच सुविधा सुरू करण्यात आली आहे. कस्तुरबामध्ये आतापर्यंत १०० रुग्ण दाखल आहेत.


हेही वाचा – करोनाशी लढा, पंतप्रधानांची नवी घोषणा! वाचा त्यांच्या संदेशातील प्रत्येक मुद्दा!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -