घरमुंबईमुंबईत होम क्वारंटाइन नागरिकांची संख्या लाखोंच्या घरात

मुंबईत होम क्वारंटाइन नागरिकांची संख्या लाखोंच्या घरात

Subscribe

मुंबईत सध्या २ लाख ११ हजार १०१ नागरिक होमक्वारंटाइन आहेत

मुंबईत पुन्हा कोरोना हॉटस्पॉट ठरत आहे. मुंबईत दिवसाला दीड हजारांचा घरात नवे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे मुंबई कोरोना रुग्ण वाढत राहिल्यास नाईट कर्फ्यू आणि कडक निर्बंध लावले जाणार आहेत. यातच जानेवारी महिन्यात मुंबईत होमक्वारंटाइन नागरिकांच्या संख्या ७० हजाराच्या घरात होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या वाढत असल्याने होमक्वारंटाइन नागरिकांमध्येही वाढ होत आहे.मुंबईत बहुतांश कोरोना लक्षणे नसल्याने अनके रुग्ण होमक्वारंटाइन आहेत. त्यामुळे गेल्यात तीन आठवड्यांत होमक्वारंटाइन झालेल्या नागरिकांची संख्येने दोन लाखांचा आकडा पार केला आहे. यात सध्या २ लाख ११ हजार १०१ नागरिक होमक्वारंटाइन आहेत. तर ५४१ नागरिक संस्थात्मक विलगीकरणात आहेत. त्यामुळे मुंबईत जवळपास २ लाखांच्या घरात नागरिक क्वारंटाइन झाले आहेत.

दिवसेंदिवस या आकडेवारीत पुन्हा भर पडत आहे. मार्च २०२० पासून कोरोना संसर्ग वाढीस सुरुवात झाली. त्या दिवसापासून ते आत्तापर्यंत ४५ लाख ५० हजार ९५६ नागरिक होमक्वारंटाइन कालावधी पूर्ण केला. जानेवारी २०२१ मध्ये कोरोना संसर्ग आटोक्यात येत होता मात्र फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोना रुग्णसंख्या पून्हा वाढू लागली. यात आता दिवसाला १७०० नव्या रुग्णांची भर पडत आहे. मुंबईत सध्या १३ हजार ९४० बाधित रुग्ण आहेत. यातील ७ हजार ६४९ रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत तर ४ हजार ८४३ रुग्णांमध्ये लक्षणे आढळली आहेत. मुंबईत आत्तापर्यंत परदेशातून आलेल्या, किंवा पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्क आलेल्या परंतु लक्षणे नसलेल्या १ लाख ६० हजार ६५८ नागरिकांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. तर पालिकेने गेल्या २४ तासांत बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या १५ हजार १८३ नागरिकांचा शोध घेतला आहे.

- Advertisement -

 

 

- Advertisement -

 

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -