घरमुंबई२२ आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या

२२ आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या

Subscribe

विश्वास नांगरे-पाटीलनाशिकचे पोलीस आयुक्त

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्यासह राज्यातील २२ आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश गृहखात्याकडून सोमवारी काढण्यात आले. नाशिकच्या पोलीस आयुक्तपदी विश्वास नांगरे पाटील यांची वर्णी लागली असून, बुधवारी ते पदभार स्वीकारणार आहेत. विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून रवींद्र सिंगल याची औरंगाबाद परिक्षेत्रात बदली झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीचा विचार करून पोलीस विभागात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. गृहखात्याकडून राज्य पोलीस विभागातील भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) अधिकार्‍याच्या बदलीचे आदेश सोमवारी जारी करण्यात आले आहेत. बदली आणि पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असणार्‍या २२ आयपीएस अधिकार्‍यांसह राज्य पोलीस सेवेतील (मपोसे) ७ पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या.

नाशिकचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांची औरंगाबाद परिक्षेत्रात विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली करण्यात आलेली आहे. नाशिकचे पोलीस आयुक्त म्हणून कोल्हापूर परिक्षेत्रातील विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील नेमणूक करण्यात आलेली आहे. पोलीस महानिरीक्षक सुहास वार्के, दहशतवादविरोधी पथक मुंबई यांची विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून कोल्हापूर परिक्षेत्रात बदली करण्यात आली आहे. औरंगाबाद परिक्षेत्र विशेष महानिरीक्षक पी.पी. मुत्याल यांना नांदेड परिक्षेत्र त्याचपदावर बदली करण्यात आली आहे. नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक एफ.के. पाटील यांची गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे पोलीस महानिरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आलेली असून सुनील रामानंद यांची गुन्हे अन्वेषण, पुणे येथून पोलीस महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई येथे बदली करण्यात आली आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे पोलीस महानिरीक्षक प्रवीण सांळुखे यांची राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभाग पोलीस महानिरीक्षकपदी नेमणूक करण्यात आली आहे. पोलीस उपमहानिरीक्षक अब्दुल रहेमान यांना पदोन्नती देऊन त्यांची बिनतारी संदेश, पुणे येथून पोलीस महानिरीक्षक म्हणून राज्य मानवी हक्क आयोग मुंबई,या ठिकाणी बदली करण्यात आली आहे. महाराष्ट्र सदन नवी दिल्ली, येथील निवासी पोलीस उपायुक्त ईशु सिंधू यांची पोलीस अधिक्षक म्हणून अहमदनगर येथे नेमणूक करण्यात आली आहे. तर अहमदनगरचे पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांची पोलीस अधीक्षक म्हणून गुन्हे अन्वेषण विभाग नागपूर येथे बदली करण्यात आली आहे.

पी. व्ही. उगले (पोलीस अधीक्षक एसीबी नाशिक, ते पोलीस अधीक्षक जळगांव), विनिता साहू (पोलीस अधीक्षक, भंडारा ते पोलीस अधीक्षक, गोंदिया), हरिष बैजल (पोलीस अधीक्षक, गोंदिया ते समदेशक, रजत राखीव पोलीस बल, गट क्रमांक ६, धुळे), अरविंद साळवे (पोलीस अधीक्षक, सुरक्षा, महावितरण, मुंबई ते पोलीस अधीक्षक, भंडारा), जयंत मीना (अप्पर पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण ते अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती, पुणे ग्रामीण), पंकज देशमुख (पोलीस अधीक्षक, सातारा ते पोलीस उपायुक्त, पुणे शहर), तेजस्वी सातपुते (पोलीस उपायुक्त, पुणे शहर ते पोलीस अधीक्षक, सातारा), दत्ता शिंदे (पोलीस अधीक्षक, जळगांव ते पोलीस अधीक्षक, सुरक्षा, महावितरण, मुंबई), दत्ता कराळे (पोलीस उपमहानिरीक्षक एटीएस ते अपर पोलीस आयुक्त ठाणे शहर), प्रताप दिघावकर ( अप्पर पोलीस आयुक्त ठाणे शहर ते महिला अत्याचार प्रतिबंधक विभाग मुंबई), जयंत नाईकनवरे ( पोलीस उपमहानरीक्षक एटीएस) संजय दराडे (नाशिक ग्रामीण ते विक्रीकर सेवाकर मुंबई) अशा बदल्या करण्यात आल्या आहेत. या बरोबर ७ महाराष्ट्र पोलीस सेवा (मपोसे) पोलीस उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत.या बदल्या निवडणूक आचार संहिता, तसेच कायदा व सुव्यस्थेची परिस्थिती विचारात घेऊन करण्यात आल्या असून बदली करण्यात आलेल्या अधिकार्‍यांना कार्यमुक्त होऊन बदलीच्या जागी रुजू होण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -