घरमुंबईमुंबईत आढळला 'झिका' व्हायरसचा दुसरा रुग्ण, 15 वर्षांच्या मुलीला लागण

मुंबईत आढळला ‘झिका’ व्हायरसचा दुसरा रुग्ण, 15 वर्षांच्या मुलीला लागण

Subscribe

मुंबईत 'झिका' व्हायरसचे रुग्ण आढळू लागल्याने चिंता व्यक्त करण्यात येत असतानात या व्हायरसचा दुसरा रुग्ण आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. आज 5 सप्टेंबर रोजी कुर्ला येथील 15 वर्षीय मुलीला झिकाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

मुंबई : मुंबईत ‘झिका’ व्हायरसचे रुग्ण आढळू लागल्याने चिंता व्यक्त करण्यात येत असतानात या व्हायरसचा दुसरा रुग्ण आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. आज 5 सप्टेंबर रोजी कुर्ला येथील 15 वर्षीय मुलीला झिकाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यापूर्वी, चेंबूर येथील 79 वर्षीय व्यक्तीला 23 ऑगस्ट रोजी झिका विषाणूची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे आता पालिका आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. झिकाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून तातडीने आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. ( 2nd patient of ‘Zika’ virus found in Mumbai)

हेही वाचा – कूपर रुग्णालयात पार पडली गुंतागुंतीची शस्त्रक्रिया, महिलेचे आणि बाळाचे वाचविले प्राण

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, कुर्ला येथे राहणाऱ्या एका 15 वर्षीय मुलीला झिका विषाणूची लागण झाल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांच्या निदर्शनास आले. सदर मुलीला गेल्या काही वर्षांपासून इतर काही आजार असल्याचेही सांगण्यात आले आहे. या मुलीला 20 ऑगस्टपासून ताप आणि डोकेदुखी अशी लक्षणे होती. तिच्या नातेवाईकांनी प्रारंभी तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार केले. मात्र नंतर तिची विशेष वैद्यकीय तपासणी करून वैद्यकीय अहवाल मागवला असता त्यात तिला झिकाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

सध्या तिला सार्वजनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. सदर बाधित रुग्णाच्या परिसरातील घरांचे सर्वेक्षण केले आहे. त्यामध्ये कोणताही नवीन संशयित रुग्ण अथवा तापाचा रुग्ण आढळला नाही, असे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या आजाराच्या चाचणी पालिकेच्या केईएम रुग्णालयात उपलब्ध आहे.

- Advertisement -

काय आहे ‘झिका व्हायरस’?

झिका व्हायरस रोग हा सौम्य आजार आहे. हा आजार संक्रमित एडिस डासांमुळे पसरतो. एडिस डास डेंग्यू आणि चिकून गुनिया या आजारांचाही प्रसार करतात. आजार विषाणूजन्य असला तरी कोविड सारखा वेगाने पसरत नाही. त्यामुळे यांवर तत्काळ उपचार केल्यास प्रकृतिक लवकर बरी होते. झिका विषाणूची लागण झालेल्या व्यक्तींपैकी 80 टक्के व्यक्तींना याची लक्षणे दिसून येत नाहीत. ज्यांना इतर आजार आहेत, त्यांना गंभीर संक्रमण होण्याची शक्यता असते ज्यास रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता असू शकते. ताप, त्वचेवर पुरळ, डोळे येणे, स्नायू आणि सांधेदुखी, अस्वस्थता आणि डोकेदुखी ही या आजाराची लक्षणे आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -