घरमुंबईएकाच दिवसात चार दुचाकींची चोरी

एकाच दिवसात चार दुचाकींची चोरी

Subscribe

भिवंडी परिसरात एकाच दिवशी चार दुचाकींची चोरी केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. भिवंडीत रोजच्या वाहन चोरीच्या घटना वाढल्याने त्या रोखण्यासाठी पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

भिवंडी परिसरात वाहन चोरीच्या घटनांनी उच्छाद मांडला असून एकाच दिवसात वेगवेगळ्या ठिकाणाहून चार मोटारसायकलची चोरी करण्यात आली असून यामध्ये रोड राणी बुलेटचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. वाढत्या वाहन चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी वाहन चोरीचे गुन्हे रोखण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.

या गाड्या गेल्या चोरीला

पहिल्या घटनेत कोनगांवतरी येथील रहिवासी मोहम्मद ईस्माईल अब्दुल लतीफ शेख यांनी त्यांची २० हजार किमतीची होंडा अ‍ॅक्टिवा दुचाकी राहत्या बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये उभी करून ठेवली होती. ही दुचाकी अज्ञात चोरट्याने अंधाराचा फायदा घेऊन चोरली. तर दुसर्‍या घटनेत गोवेगांव येथील कमलाकर लक्ष्मण पाटील यांनी ४० हजार किमतीची युनिकॉर्न मोटारसायकल राहत्या घरासमोर उभी केली होती. ती देखीलअज्ञात चोरट्याने चोरून पसार झाला आहे. या दोन्ही दुचाकींच्या चोरीप्रकरणी कोनगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तर तिसर्‍या घटनेत गोविंद नगर येथील निवासी संदीप राजबहादूर यादव यांनी त्यांची १ लाख २० हजार रुपये किमतीची बुलेट मोटारसायकल घरासमोर पार्क केली, असता चोरट्याने या रोड राणीला चोरून नेली आहे.

- Advertisement -

या चोरीप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस चोरट्याचा कसून शोध घेत आहेत. चौथ्या घटनेत एकता चौक, खाडीपार येथे वास्तव्यास असलेले तारिक अब्दुल वली खान यांनी त्यांची होंडा मोटारसायकल वंजारपट्टी नाका येथील बारादरी हॉटेल समोरील उड्डाणपुलाखाली उभी करून ठेवली असता ती चोरट्याने पळवून नेल्याची घटना घडली आहे. या चोरीचा निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी करीत आहे. भिवंडीत रोजच्या वाहन चोरीच्या घटना वाढल्याने त्या रोखण्यासाठी पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे राहिले असून पोलिसांनी वेळीच उपाययोजना केली नाही, तर चोरट्यांचे मनसुबे वाढून नागरिकांना वाहने सुरक्षित ठेवण्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे.


वाचा – वाहन चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्याला कुर्ला पोलिसांकडून अटक

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -