घरताज्या घडामोडीकल्याण- डोंबिवलीत कोरोनाचे थैमान; ४९८ नवे रुग्ण, तर २१६ मृत्यू

कल्याण- डोंबिवलीत कोरोनाचे थैमान; ४९८ नवे रुग्ण, तर २१६ मृत्यू

Subscribe

कल्याण-डोंबिवली क्षेत्रात आतापर्यंत ७ हजार ५६३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

देशभरासह महाराष्ट्रात कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुंबई, पुणे शहरापाठोपाठ आता कल्याण-डोंबिवली शहरात देखील कोरोनाने थैमान घातले आहे. कल्याण- डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा कहर सुरू असून आज ४९८ कोरोनाबाधित नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज २१६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

७५६३ जण कोरोनामुक्त

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात आढळून आलेल्या बाधित रुग्णांपैकी आतापर्यंत ७ हजार ५६३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या ६ हजार २९५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

- Advertisement -

असे आढळले नवे रुग्ण

कल्याण (पू) : १२४, कल्याण (प): १४३
डोंबिवली (पू) : १२७, डोंबिवली (प) :७४
मांडा-टिटवाळा : १२
मोहना : १५
पिसवली : ०३

लॉकडाऊन १९ जुलैपर्यंत वाढवण्याचा निर्णय

कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महानगरपालिका आयुक्तांनी लॉकडाऊनबाबत नवा आदेश काढला आहे. कोरोना व्हायरसच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने लॉकडाऊन १९ जुलैपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. २ जुलैला या भागात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. हा लॉकडाऊन १२ जुलैपर्यंत असेल, असं सांगण्यात आले होते.

- Advertisement -

हेही वाचा – धक्कादायक! ‘BSF’च्या ६८ जवानांना कोरोनाची लागण


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -