घरताज्या घडामोडीधक्कादायक! ‘BSF’च्या ६८ जवानांना कोरोनाची लागण

धक्कादायक! ‘BSF’च्या ६८ जवानांना कोरोनाची लागण

Subscribe

मागील २४ तासांत बॉर्डर ऑफ सिक्युरिटी फोर्सचे (BSF)चे आणखी ६८ जवान कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत, अशी माहिती एएनआयने दिली आहे.

कोरोना विषाणूने संपूर्ण जगात अक्षरश: थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधिताच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. या कोरोनाला आळा घालण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा, पोलीस प्रशासन, सीमेवर लढणारे जवान अहोरात्र मेहनत घेत आहेत. मात्र, आता हे जवान देखील कोरोनाच्या विळख्यात सापडल्याचे दिसत आहे. मागील २४ तासांत बॉर्डर ऑफ सिक्युरिटी फोर्सचे (BSF)चे आणखी ६८ जवान कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत, अशी माहिती एएनआयने दिली आहे. (Border Security Force) अर्थात बीएसएफच्या ६८ जवानांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता बीएसएफच्या दलात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisement -

४८ जवानांनी केली कोरोनावर मात

गेल्या २४ तासांत बॉर्डर ऑफ सिक्युरिटी फोर्सचे (BSF)चे ६८ जवानांना कोरोनाची लागण झाली असून यातील ४८ जवानांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत २ हजार ९३ जणांना कोरोनाची लागण झाली असून यातील १ हजार ६० जवानांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या १ हजार २४ Active केसेस आहेत.

देशात २४ तासांत कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ!

देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशात गेल्या २४ तासांत कोरोनाबाधित रुग्णसंख्येत आतापर्यंत सर्वात मोठी वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत २९ हजार ४२९ कोरोनाबाधित नवीन रुग्ण आढळले असून ५८२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ९ लाख ३६ हजार १८१वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत २४ हजार ३०९ जणांचा मृत्यू झाला असून ५ लाख ९२ हजार ३२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर देशात सध्या ३ लाख १९ हजार ८४० रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – अमेरिकेने दिली खुशखबर; लॉकडाऊनच चक्र लवकरच संपणार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -