घरमुंबईराणीच्या बागेत सांडपाण्यावर प्रक्रिया; दररोज ५ लाख लिटर शुद्ध पाणी उपलब्ध होणार

राणीच्या बागेत सांडपाण्यावर प्रक्रिया; दररोज ५ लाख लिटर शुद्ध पाणी उपलब्ध होणार

Subscribe

भायखळा येथील राणीची बाग ही मुंबईकरांसह बाहेरील पर्यटकांचे खास आकर्षण आहे. या राणी बागेत प्रशासन लवकरच सांडपाण्यावर प्रक्रिया करून दररोज ५ लाख लिटर शुद्ध पाणी कायमस्वरूपी उपलब्ध करण्यात येणार आहे.

भायखळा येथील राणीची बाग ही मुंबईकरांसह बाहेरील पर्यटकांचे खास आकर्षण आहे. या राणी बागेत प्रशासन लवकरच सांडपाण्यावर प्रक्रिया करून दररोज ५ लाख लिटर शुद्ध पाणी कायमस्वरूपी उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे पालिकेकडून पुरविण्यात येणाऱ्या शुद्ध पाण्याची, त्यावरील खर्चाची मोठया प्रमाणात बचत होणार आहे. या संदर्भातील माहिती राणी बाग प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली.

मुंबईची वाढती लोकसंख्या पाहता मुंबईला सात तलावांमधून होणारा ३,८५० दशलक्ष लिटर इतका दैनंदिन पाणीपुरवठा होत असला तरी त्यापैकी २७ टक्के पाणी चोरी होत असल्याने अथवा वाया जात असल्यानं ते पाणी अपुरे पडत आहे. त्यामुळेच राज्य सरकार व मुंबई महापालिकेने नवीन तलाव बांधण्यापेक्षा सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्या पाण्याचा वापर पिण्याव्यतिरिक्त कामांसाठी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, मुंबईला लाभलेल्या अथांग समुद्रातील पाण्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून त्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

या दोन्ही निर्णयांमुळे एकीकडे पिण्याच्या पाण्याची मोठी बचत होणार आहे तर दुसरीकडे पिण्यासाठी मुंबईतच मुबलक पाणीसाठा उलपलब्ध होणार आहे. याच धोरणाचा अवलंब राणी बागेत करण्यात येणार आहे. पक्षी व प्राण्यांसाठी पाण्याची मोठी गरज भासत असते. विशेषतः उन्हाळ्यात सर्व सामान्य व्यक्तींप्रमाणेच प्राणी व पक्षी यांना पाण्याची गरज जास्त प्रमाणात भासत असते. सध्या राणीच्या बागेत प्राण्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी दिले जाते. तसेच,पक्षी व प्राण्यांना जलक्रीडेचा आनंद देण्यासाठी यापुढे राणी बागेतच पाण्याचा साठा उपलब्ध करण्यात येणार आहे.

राणीच्या बागेत एकदा वापरलेल्या पाण्याचे रूपांतर सांडपाण्यात झाल्यावर ते नाल्यात सोडून न देता त्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करून त्या सांडपाण्याचे रूपांतर शुद्ध स्वरूपाच्या पाण्यात करण्यात येणार आहे. त्यामुळे दररोज ५ लाख लिटर शुद्ध पाणी उपल्बध होणार आहे. मात्र त्या पाण्याचा वापर पिण्यासाठी न करता पिण्याव्यतिकरिक्त कामांसाठी म्हणजे उद्यान कामांसाठी, पक्षी, प्राणी यांना जलक्रीडेचा आनंद देण्यासाठी, पक्षी व प्राणी यांचे पिंजरे धुण्यासाठी, स्वछतेसाठी आणि येथील प्रसाधनगृहासाठी व इतर कामांसाठी करता येणार आहे. मात्र त्यासाठी राणी बाग प्रशासनाला वेगळी जलवाहिनी, ते पाणी ठिकठिकाणी साठविण्यासाठी टाकी उपलब्ध करावी लागणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Weather Update : राज्यात येत्या ४-५ दिवसात जोरदार वाऱ्यासह पावसाचा हवामान विभागाचा अंदाज

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -