घरमुंबईबीकेसीमध्ये सापडला साडे सहा फूट लांबीचा अजगर

बीकेसीमध्ये सापडला साडे सहा फूट लांबीचा अजगर

Subscribe

वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स या गजबजलेल्या परिसरात गुरुवारी मध्यरात्री अजगर आढळून आला आहे. हा अजगर तब्बल साडे सहा फुटांचा असल्याची माहिती मानव अभ्यास संघाकडून देण्यात आली आहे.

आजकाल मोठ्या प्रमाणात जंगतोड आणि झाडांची कत्तल केली जाते. त्यामुळे वन्यजीव शहरी भागात वळत असल्याचे दिसून येत आहे. वांद्रा कुर्ला कॉम्पलेक्स या गजबजलेल्या परिसरात येथील आयकर विभाग ऑफिसच्या मागील रस्त्यावर साडे सहा फुटाचा अजगर आढळून आला आहे. दरम्यान तात्काळ मानव अभ्यास संघाला संपर्क करत याची माहिती देण्यात आली. त्यानुसार सर्प मित्रांनी येऊन अजगराला पकडले केले.

हा अजगर साडे सहा फुट लांबीचा असून सध्या तो मानव अभ्यास संघाकडे आहे. मात्र हा अजगर ठाणे वनविभागाकडे देण्यात येणार असून या अजगराची वैद्यकीय चाचणी करुन हा अजगर पुन्हा जंगलात सोडण्यात येणार आहे.

- Advertisement -

अजगर रस्त्यावर कसा आला?

गुरुवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास वांद्रा कुर्ला कॉम्पलेक्सच्या रस्त्यावर अजगर आढळला. सलग चार दिवस पाऊस पडल्यामुळे ह्या अजगराच्या बिळामध्ये पाणी साचल्याने हा अजगर रस्त्यावर आला असल्याची माहिती मानव अभ्यास संघाकडून देण्यात आली आहे.

महिन्याला सापडले सात अजगर

मेट्रो बांधकामासाठी कांदळवन तोडण्यात आली आहेत. त्यामुळे गेल्या वर्षांपासून या परिसरात वन्यजीव मोकाट फिरत आहेत. गेल्या सात महिन्यांपासून वांद्रा कुर्ला कॉम्पलेक्समध्ये आता पर्यंत सात अजगर आढळून आले आहेत. त्याचबरोबर कोब्ररा, घोणस, धामण, पानदिवड आणि नानेटी या जातीचे आता पर्यंत ५० साप पकडण्यात आले आहेत.

– सर्प मित्र अतुल कांबळे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -