घरCORONA UPDATECoronaVirus: ताज हॉटेलमधील ६ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

CoronaVirus: ताज हॉटेलमधील ६ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

Subscribe

मुंबईच्या प्रवेशद्वाराजवळील ताज हॉटेलमधील तब्बल ६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

मुंबईच्या प्रवेशद्वाराजवळील ताज हॉटेलमधील तब्बल ६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत असून यामध्ये आता ताज हॉटेल परिसराचाही समावेश झाला आहे. ताज हॉटेलमध्ये सध्या अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांच्या राहण्याची मोफत सोय करण्यात आली आहे. रतन टाटा यांनी आरोग्य सेवा देणारे डॉक्टर्स, नर्रेस अशा कर्मचाऱ्यांच्या राहण्याची, खाण्या-पिण्याची सुविधा ताज हॉटेलमध्ये केली आहे. तसेच त्यांनी त्यांच्या ५०० कर्मचाऱ्यांचीही कोरोना चाचणी केली आहे. परंतू आता ताजमधील ६ लोकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे.

हेही वाचा – विद्यापिठाच्या परीक्षा होणारच – उदय सामंत

- Advertisement -

बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू 

बॉम्बे हॉस्पिटलचे कन्सल्टिंग फिजिशिअन डॉ. गौतम भंसाली यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, ताज हॉटेलमधील त्या ६ कोरोनाबाधितांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून ते त्याच्या सुधारणा पाहायला मिळत आहे. देशात सध्या २४२ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ७ हजार ५२९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासात देशात एकूण ७६८ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर ३६ लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तसेच ६५३ जण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर राज्यात आज नव्याने ८२ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा २ हजारांवर गेला आहे. आज पिंपरी चिंचवड ३, मुंबई ५९, मालेगाव १२, ठाणे ५, वसई विरार १ आणि पालघर येथे २ रुग्ण आढळून आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -