घरUncategorizedसिन्नर तालुक्यात कोरोनाचा शिरकाव; वयोवृद्धाचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह

सिन्नर तालुक्यात कोरोनाचा शिरकाव; वयोवृद्धाचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह

Subscribe

नाशिक जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची वाढत आहे. नाशिक शहर, निफाड, मालेगाव, चांदवड तालुक्यांनंतर आता सिन्नर तालुक्यात कोरोना आजाराने शिरकाव केला आहे. सोमवारी (13) सिन्नर तालुक्यातील 65 वर्षीय रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. नाशिक जिल्ह्यात आता कोरोनाबाधित 34 रुग्ण झाले असून त्यातील सर्वाधिक 28 रुग्ण मालेगावातील आहेत.

65 वर्षीय व्यक्तीवर नाशिक शहरातील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या घशाचे नमुने पुणे येथील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. ते सोमवारी सकाळी जिल्हा रुग्णालयास मिळाले आहेत. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आरोग्य विभाग हादरून गेला आहे. विशेष म्हणजे पॉझिटिव्ह रुग्णाच्या कुटूंबातील सदस्य मालेगावात येथून आले आहेत. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. आधीच मालेगावात सर्वाधिक रुग्ण आढळून आल्याने त्या रुग्णांच्या  संपर्कातील नातलग व नागरिकांचा शोध घेतला जात आहे. तसेच, मालेगावात रुग्ण राहत असलेल्या परिसरातील नागरिकांची तपासणी केली जात आहे. त्यातच आता सिन्नर तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभागाची धावपळ सुरू झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्ण कोणाच्या संपर्कात आला. त्याचे नातलग व संपर्कातील नागरिकांचा शोध आरोग्य विभागास घ्यावा लागणार आहे.

- Advertisement -

मालेगावात नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही. सिन्नर तालुक्यातील रुग्ण सोमवारी पॉझिटिव्ह दिसून आला आहे. अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -