घरमुंबईMumbai Republic Day LIVE: शिवाजी पार्कमध्ये राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण

Mumbai Republic Day LIVE: शिवाजी पार्कमध्ये राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण

Subscribe

राज्याचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते ध्वजारोहण करत राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात येणार आहे.  या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रमुख उपस्थिती मोरेशिअसचे पंतप्रधान प्रवींद्र जुगन्नाथ उपस्थित आहेत.

 

राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमातील भाषणा दरम्यान, सर्वांना 70 व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या भाषणावेळी नेमकं काय म्हणाले राज्यपाल.

- Advertisement -

बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम सुरू असून, शिवस्मारकाचे काम देखील सुरू होईल हे सांगायला मला आनंद होत आहे.

राज्यातील उद्योगिक व्यवसाय सुधारण्यासाठी राज्य कटिबद्ध आहे.

- Advertisement -

सरकारने उपग्रहाच्या आणि ड्रोनच्या सहाय्याने शेती समस्या सोडवण्यासाठी उपक्रम राबाबला आहे.

जलयुक्त शिवार योजना अंतर्गत 15 हजाराहून अधिक गावामध्ये सिंचन देण्यात आले आहे.

मागेल त्याला शेततळे या योजनेला प्रधानमंत्री पुरस्कार मिळाला आहे.

आरक्षण विधेयक आम्ही मान्य केले हे सांगण्यास मला आनंद वाटत आहे.

मराठा समाजातील मुलांना शिक्षण आणि नोकरीत प्रगती करता येणार आहे.

आदिवासी भागातून कुपोषणावर मात करण्यासाठी ए. पी. जे. अब्दुल कलाम योजना राबवण्यात येत आहे.

पंतप्रधान आवास योजनेतून 3 लाख घरे निर्माण करण्यात आली आहेत.

सार्वजनिक वाहतूक सेवा जलद होण्यासाठी 55 उड्डाण पूल तयार करण्यात येणार आहेत.


देशामध्ये 70 वा प्रजासत्ताक दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. मुंबईतील दादर शिवाजी पार्क येथे दरवर्षीप्रमाणे प्रजासत्ताक दिनानिमित्तानं विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते ध्वजारोह करत राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात येणार आहे.  या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रमुख उपस्थिती मोरेशिअसचे पंतप्रधान प्रवींद्र जुगन्नाथ उपस्थित आहेत. दादर शिवाजी पार्कवरील प्रजासत्ताक दिनाचं खास आर्कषण म्हणजे परेड आणि आकर्षक चित्ररथ आहे. मुंबई पोलीस, नौदल, मुंबई पोलीस वाहतूक विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग, अग्निशमन दल, मुंबई पोलीस बँड पथ, होमगार्ड, कोस्ट गार्ड, रेल्वे पोलीस आणि एसटी महामंडळ सुरक्षा रक्षक अशा सर्वच विभागातील जवानांनी परेडच्या माध्यमातून राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात येणार आहे. अन्य ठिकाणच्या शाळेतील विध्यार्थी ही परेडमध्ये सहभागी झालेत. तर विविध विभागाचे चित्ररथ एक वेगळं आकर्षण ठरणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -