घरमुंबईबीकेसीमध्ये अजगरांचा सुळसुळाट; ९ फूटी अजगर जेरबंद 

बीकेसीमध्ये अजगरांचा सुळसुळाट; ९ फूटी अजगर जेरबंद 

Subscribe

वांद्रा -कुर्ला कॉम्पलेक्समध्ये अजगरांचा सुळसुळाट दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या महिन्यातच एका अजगराला जेरबंद करण्यात आले होते. सोमवारी रात्री पुन्हा दोन अजगर दिसले. त्यामधील एका अजगराला जेरबंद करण्यात आले तर दुसरा अजगर निसटला.

मुंबईतील वांद्रे- कुर्ला कॉम्पलेक्स परिसरामध्ये पुन्हा दोन भलेमोठे अजगर दिसले. त्यामधील एका अजगराला पकडण्यात यश आले आहे. दोन अजगर दिसल्यामुळे या परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. मात्र सोमवारी रात्री एका पोलिसाने आणि सर्पमित्राने यामधील एका ९ फुटी अजगराला पकडले. तर दुसऱ्या अजगर निसटला. बीकेसीमध्ये अनेक मोठमोठ्या कंपन्या आणि ऑफिस असल्यामुळे या परिसरामध्ये माणसांची मोठी वर्दळ असते. गेल्या वर्षभरापासून या परिसरामध्ये अजगरांचा वावर वाढत चालल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

- Advertisement -

दोन भलेमोठे अजगर दिसले

वांद्रे- कुर्ला कॉम्पलेक्समधील मिठी नदीच्या पुलाजवळ रात्री दोन मोठे अजगर दिसले. सिध्दिविनायक मंदिरामध्ये रात्री पायी चालत जाणाऱ्या भक्तांना हे अजगर दिसले. त्यांनी ताबडतोब यासंदर्भात पोलिसांना फोन करुन सांगितले. माहिती कळताच पोलीस, सर्पमित्रांनी घटनास्थळावर धावू घेऊन अजगराचा शोध सुरु केला. त्यामधील एका ९ फुटी अजगराला पोलीस आणि सर्पमित्राने जेरबंद केले. तर दुसरा १२ फुटाचा अजगर निसटला.

बीकेसी म्हणजे अजगरांचे घर

मुंबईतील ‘वांद्रे – कुर्ला कॉम्प्लेक्स’ या हायप्रोफाईल परिसरामध्ये अनेक मोठ्या कंपनींची कार्यालये आहेत. अनेक मल्टिनॅशनल कंपन्या आणि आलिशान महागडी रेस्टॉरंट अशीच बीकेसीची ओळख आहे. त्यामुळे या भागामध्ये कायमच माणसांची प्रचंड वर्दळ असते. पण गेल्या काही महिन्यांपासून बीकेसी परिसरात अजगरांचा सुळसुळाट झाला आहे. गेल्या ९ महिन्यांमध्ये बीकेसी परिसरातून एकूण २० अजगर पकडण्यात आले आहेत. तर महिन्याला दोन अजगर सापडतातच अशी माहिती सर्पमित्र अतुल कांबळे यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या – 

बीकेसीमध्ये अजगरांचा सुळसुळाट, २० अजगर पकडले

बीकेसी नव्हे, ही तर अजगर शाळा!

बीकेसीमध्ये सापडला साडे सहा फूट लांबीचा अजगर 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -