घरमुंबईगिरणी कामगारांच्या कुटुंबियांची जीवघेणी कसरत

गिरणी कामगारांच्या कुटुंबियांची जीवघेणी कसरत

Subscribe

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हीडिओने मुंबईत खळबळ उडवून दिली आहे. या व्हीडिओत काही मुले शाळेत जाण्यासाठी जीवघेणी कसरत करताना दिसत आहे. हा व्हीडियो मुंबईतील चुनाभट्टी येथील मोडकळीस आलेल्या एका चार मजली इमारतीचा असून या इमारतीचे काही सज्जे पडलेले आहेत. या सज्जांवरून रहिवाशी जिन्यापर्यंत जाण्यासाठी दोरीचा आधार घेत असल्याचे भयानक चित्र व्हायरल झालेल्या व्हीडिओच्या माध्यमातून समोर आले आहे.

मुंबईतील चुनाभट्टी या विभागातील टाटा नगर येथे असलेलीच स्वदेशी मिल बंद पडून १९ वर्षे उलटली आहेत. मात्र येथील १२३ गिरणी कामगारांचे कुटुंब ८० वर्षे जुनी मोडकळीस आलेल्या ४ मजली इमारतीत वास्तव्य करीत आहेत. न्यायप्रविष्ट असलेल्या या इमारतीची अवस्था बिकट असून जागोजागी सज्जे कोसळले आहेत. भिंती जीर्ण झालेल्या असून जिने देखील मोडकळीस आलेले आहेत. काही वर्षांपूर्वीच ही इमारत महानगर पालिकेने धोकादायक घोषित केलेली आहे. मात्र येथील कुटुंबे इमारत रिकामी करीत नसल्याचे बघून महानगर पालिकेने वीज पाणी कापले होते. त्यावेळी काही गिरणी कामगार खोल्या रिकाम्या करून जवळच भाडे तत्वावर राहत आहेत. तर गिरणी कामगारांचे काही कुटुंबीय अजूनही मोडकळीस आलेल्या इमारतीत राहत आहेत.

- Advertisement -

स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मदतीने या इमारतीचे वीज पाणी पूर्ववत करण्यात आल्यामुळे काही भाडेकरू देखील या इमारतीत राहण्यास आलेले आहेत. टाटाने १३० वर्षे पूर्वी सुरु केलेली स्वदेशी मिल ही मुंबईतील पहिली मिल होती.पाच हजार कामगार या मिलमध्ये काम करीत होते. सन २००० साली ही मिल बंद पडली. मिलची सर्व मालमत्ता लिक्विडेशनमध्ये गेली. या मिलच्याच जागेत कामगारांची वस्ती होती, त्यापैकी मोडकळीस आलेली ही एक चार मजली इमारत आहे. ८०वर्षे जुनी असलेली ही न्यायप्रविष्ट असल्यामुळे,ही इमारत विकासकाने विकसित करून द्यावी म्हणून येथील रहिवाशी २०१२ पासून उच्च न्यायालयात खेटे घालत आहेत.

वाद कोर्टात- आ.कुडाळकर                                                                                              याबाबत शिवसेनेचे स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर यांना व्हायरल झालेला व्हीडिओ दाखवून याबाबत तुमची नक्की काय भूमिका आहे, असे विचारण्यात आले असता त्यांनी येथील इमारतींच्या पुनर्बांधणीचा वाद कोर्टात असल्यामुळे इमारतींची कामे रखडली आहेत. त्यामुळे यासंबंधी न्यायालयाचा निकाल येत नाही, तोपर्यंत सरकारने यांना तात्पुरता निवारा द्यावा, असे ‘आपलं महानगर’ला सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -