घरताज्या घडामोडीसर्दीला करोना समजून एकाची आत्महत्या

सर्दीला करोना समजून एकाची आत्महत्या

Subscribe

चीनबरोबरच जगातील अनेक देशांमध्ये मृत्यूचे तांडव घालणाऱ्या करोनाचा धसका घेऊन आंध्र प्रदेशमधील चित्तूर जिल्ह्यात एका ५४ वर्षीय व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बालाकृष्णैया असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

चित्तूर जिल्ह्यतील थोट्टमबेडू गावात राहणाऱ्या बालाकृष्णैय्या यांना अनेक दिवसांपासून सर्दी, खोकला व ताप होता. औषधे घेऊनही आराम मिळत नसल्याने ते वैतागले होते. त्यातच त्यांनी टीव्हीवर करोना व्हायरसबद्दल बघितले. त्यामुळे आपल्याला करोनाची लागण झाल्याचा त्यांना संशय आला. ही शंका त्यांनी मुलाजवळ बोलून दाखवल्याने त्याने त्यांना ताबडतोब डॉक्टरकडे नेले. डॉक्टरांनी त्यांना काही चाचण्या करण्यास सांगितले. त्यात बालाकृष्णैय्या यांना युरिनरी इन्फेक्शन झाल्याचे स्पष्ट झाले. डॉक्टरांनी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना मास्क लावण्याचा सल्ला दिला. यामुळे बालाकृष्णैय्या यांचा संशय आणखीनच बळावला. अशिक्षित असल्याने त्यांना डॉक्टरांनी काय सांगितले ते कळालेच नाही. आपल्याला करोना व्हायरसची लागण झाली असून आपण घाबरु म्हणून डॉक्टरांनी ते आपल्यापासून लपवले असेल असे बालाकृष्णैय्या यांना वाटले. करोना रुग्णांचा मृत्यू होत आहे हे त्यांनी टीव्हीवर पाहील्याने आपणही आता मरणार अशी भीति त्यांना वाटू लागली .यामुळे त्यांना नैराश्य आले. त्यानंतर त्यांनी घरातल्यांबरोबर बोलणे टाकले. एका खोलीत त्यांनी स्वत;ला कोंडून घेतले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या आईच्या समाधीजवळच झाडाला गळफास बांधून आत्महत्या केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -