घरमुंबईमुंबईत लेप्टोस्पायरोसिसचा पहिला बळी

मुंबईत लेप्टोस्पायरोसिसचा पहिला बळी

Subscribe

मुंबईत लेप्टोस्पायरोसिसमुळे पहिला बळी गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. शीव रुग्णालयात १५ वर्षाच्या मुलाला लेप्टो झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पण, अजूनही त्याच्या मृत्यूचं कारण अस्पष्ट असल्याचं मुंबई महापालिकेच्या आरोग्य कार्यकारी अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी सांगितले आहे. प्राचील काळे असे या मुलाचे नाव असून त्याला लेप्टोस्पायरोसिस झाल्याचा संशय त्याची आई भारती काळे यांनी व्यक्त केला आहे. पण, नेमका मृत्यू कशामुळे झाला ते स्पष्ट झालं नाही. त्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात येणार आहे. या बैठकीनंतर त्याच्या मृत्यूचं कारण लेप्टो आहे की आणखी काही हे स्पष्ट होईल.

गेले तीन दिवस मुंबईत पावसाने चांगलाच जोर धरला. रस्त्यावर सखल भागात पाणी साचलं होतं. अनेक मुंबईकरांना रस्त्यावर साचलेल्या घाण पाण्यातून रस्ता काढत प्रवास करावा लागला. त्यामुळे मुंबईकरांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. रस्त्यावरील साचलेल्या पाण्यात प्राण्यांची  विष्ठा मिसळते. अशावेळी अंगावरची उघडी जखम पाण्यात भिजली तर लेप्टोचा बॅक्टेरिया शरीरात प्रवेश करतो. त्यामुळे लेप्टोस्पायरोसिस होण्याची शक्यता वाढते. विशेष म्हणजे उंदराच्या विष्ठेतून लेप्टोस्पायरोसिस हा विषाणू पसरतो.

“ १५ वर्षाचा मुलगा लेप्टोस्पायरोसिस संशयित म्हणून शीव रुग्णालयात दाखल झाला होता. त्याचा सोमवारी मृत्यू झाला आहे. पण, अजूनही त्याचा मृत्यू कशामुळे झाला हे स्पष्ट झालेलं नाही. यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीत त्याचा मृत्यू नेमका लेप्टोस्पायरोसिसमुळेच झाला आहे की नाही ते स्पष्ट होईल. ”

डॉ. पद्मजा केसकर, आरोग्य कार्यकारी अधिकारी, मुंबई महापालिका

 

- Advertisement -

लेप्टोस्पायरोसिसची लक्षणं 

ताप, अंगदुखी, डोकेदुखी आणि पोटदुखी

कोणती काळजी घ्याल ?

  • संसर्ग रोखण्यासाठी पावसाळ्यात साचलेल्या पाण्यातून जाऊ नये.
  • साचलेल्या पाण्यातून जाताना गमबूट घालावे.
  • उघडय़ा जखमांचा पाण्याशी संपर्क येणार नाही, याची काळजी घ्यावी.
  • लेप्टो या आजाराची लवकरच तपासणी करून घ्यावी.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -